शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

दुचाकी, चारचाकी वाहनांना मुख्य बाजारपेठेत ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 5:00 AM

केंद्र व राज्य सरकारकडून सूचना प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी एक आदेश निर्गमित करून बाजारपेठेतील काही दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. तर या आदेशानंतर उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून निर्गमित केलेल्या आदेशानुसार आळीपाळीने दुकाने उघडण्याची मुभा दिली आहे.

ठळक मुद्देपोलीस प्रशासनाचा निर्णय। नागरिकांची गर्दी टाळण्यावर दिला जातोय भर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात ग्रीन झोन असलेल्या वर्धा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. याचाच फायदा काही व्यक्ती घेत बाजारपेठेत विनाकारण गर्दी करीत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांना वर्धा बाजारपेठेत पोलिसांच्यावतीने प्रवेश बंदी करण्यात आली आहे. सदर निर्णय गर्दी टाळण्यासाठी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.केंद्र व राज्य सरकारकडून सूचना प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी एक आदेश निर्गमित करून बाजारपेठेतील काही दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. तर या आदेशानंतर उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून निर्गमित केलेल्या आदेशानुसार आळीपाळीने दुकाने उघडण्याची मुभा दिली आहे. बाजारपेठेतील काही दुकाने उघडण्याची परवानगी मिळताच सध्या नागरिकांकडून बाजारपेठेत विनाकारण गर्दी केल्या जात असल्याचे आणि सदर प्रकार कोरोनाचा झपाट्याने प्रसार होण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे अधिकाºयांच्या निदर्शनास आल्यावर शनिवारी वर्धा शहर व वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांच्यावतीने बाजारपेठेत जाणारे ठिकठिकाणचे रस्ते बॅरिकेटस् लावून बंद करण्यात आले आहे. शिवाय बाजारपेठेत दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी राहणार असल्याची सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.मुख्य मार्गावर वाहन उभे करून करावी लागेल साहित्य खरेदीविविध साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत जाऊ इच्छिणाºया व्यक्तींना वर्धा शहरातील मुख्य मार्गावर रस्त्याच्या कडेला इतरांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही अशा पद्धतीने वाहने उभी करून पायदळ बाजारपेठेत जावे लागणार आहे. इतकेच नव्हे तर जो व्यक्ती बाजारपेठेत वाहन नेईल त्याच्यावर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.प्रमुख मार्गाचा वापर ठरेल फायद्याचाशिवाजी चौकातून बाजारपेठेत न येऊ इच्छिणाऱ्यांनी तसेच बजाज चौक, डॉ. आंबेडकर चौक, इतवारा चौक भागात जाऊ इच्छिणाºयांना प्रमुख मार्ग असलेल्या जेलरोड मार्गे या परिसरात जावे लागणार आहे. तसेच वर्धा रेल्वे स्थानकाकडे जाऊ इच्छिणाऱ्यांना वंजारी चौक, शास्त्री चौक होत जाता येणार आहे. एकूणच पुढील आदेशापर्यंत दररोज दुपारी २ वाजेपर्यंत बाजारपेठेत वाहनांचा प्रवेश बंदी राहणार आहे.वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ते अरुंद आहेत. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार आळीपाळीने काही दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय बाजारपेठ क्षेत्र गर्दीचे ठिकाण म्हणून घोषित झालेले आहे. सदर भागात गर्दी वाढल्यामुळे नेहमी वाहतूक कोंडी होत आहे. या भागात गर्दी नियंत्रित करण्यासाठी दुपारी २ वाजेपर्यंत बाजारपेठेत दुचाकी, तीनचाकी तसेच चारचाकी वाहन नेण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याकरिता सदर भागात जाणारे रस्ते तात्पूर्ते स्वरूपात बॅरिकेटस् लावून बंद करण्यात आले आहे. इतर सर्व रस्ते पूर्वीप्रमाणे सुरू आहेत.- योगेश पारधी, ठाणेदार, शहर पोलीस ठाणे, वर्धा

टॅग्स :MarketबाजारTrafficवाहतूक कोंडी