शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

दुचाकी चोराला नाशिक येथून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 11:19 PM

येथील महाविद्यालयातून महागडी दुचाकी वाहने लंपास करून ती अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे विकणाऱ्या अमरावतीच्या चोरट्याला नाशिक येथून अटक करण्यात आली.

ठळक मुद्देतब्बल १७ वाहने चोरल्याची कबुली : तिवसा होते दुचाकी विक्रीचे मुख्य केंद्र

ऑनलाईन लोकमतवर्धा : येथील महाविद्यालयातून महागडी दुचाकी वाहने लंपास करून ती अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे विकणाऱ्या अमरावतीच्या चोरट्याला नाशिक येथून अटक करण्यात आली. ही कारवाई रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेशन पथकाने केली.या चोरट्याला वर्धेत आणून पोलिसी हिसका दाखविताच त्याने जिल्ह्यातून बुलेटसह अनेक महागड्या गाड्या चोरल्याचे कबुल केले. त्या गाड्या जप्त करण्याची कारवाई रामनगर पोलिसांकडून सुरू आहे.आलोडी येथील राहुल मानेकर (३१) यांची एमएच ३२ व्ही ३६३७ क्रमांचा दुचाकी पिपरी येथील श्रीकृष्ण मंदिर परिसरातून चोरी झाल्याची तक्रार रामनगर ठाण्यात करण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला असता अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील चोरीची दुचाकी विक्री झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी तिवसा गाठत तपास केला. या तपासात गिरीष सोळंके (३२) रा. विलासनगर, अमरावती याने या गाड्या विकल्याचे सामोर आले. त्यावरून त्याचा शोध घेत गिरीषला नाशिक येथून अटक केली. त्याच्याजवळून चोरी गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार विजय मगर, सहायक पोलीस निरीक्षक सचिन यादव, हवालदार सुनील भगत, आकाश जुमडे, संतोष कुकडकर, नरेंद्र कांबळे यांनी केली.चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या दोघांना अटकवर्धा- रस्त्याने पायी जात असलेल्या इसमाला चाकुचा धाक दाखवून लुटमार करणाºया दोघांना शहर पोलिसांच्या गुन्हे अन्वेशन विभागाने अटक केली. त्यांच्याजवळून चाकू व चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. प्रविण मोहन कांबळे रा. एफसीआय झोपडपट्टी व सुरज संतोष फुलझले रा. बरबडी अशी अटकेती आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलीस सूत्रानुसार, विशाल ठाकरे (३०) रा. प्रतापनगर यांना दोन युवकांनी चाकूचा धाक दाखवून लुटले. त्यांच्याजवळूल एकूण १४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी तपास सुरू केला असता ठाकरे यांचा मोबाईल राजु प्रधान रा. महसुलनगर, बरबडी हा वापरत असल्याचे समोर आले. पोलिसांनी या माहितीच्या आधारे राजु प्रधान याला विचारणा केली असता प्रविण कांबळे व सुरज फुलझले या दोघांनी त्याला हा मोबाईल दिल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी या दोघांना अटक केली. त्यांच्याजवळून चाकू, चोरीचे मोबाईल व दुचाकी जप्त केली.महागड्या गाड्या चोरण्याकडे विशेष लक्षअटकेत असलेला चोरटा छोट्या दुचाकी कमी तर महागड्या दुचाकी अधिक चोरत असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. य दुचाकी जप्त करणे अद्याप बाकी आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा