हरिदास ढोक।लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : मागील दोन आठवड्यापासून सीसीआयच्यावतीने खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. आतापर्यंत केवळ २५ व २६ नोव्हेंबर या दोन दिवसांचे चुकारे देण्यात आले आहेत. तर उर्वरित दिवशी शेतमाल विक्री करणारे शेतकरी सीसीआयच्या कार्यालयात येरझारा मारत आहेत. सीसीआयच्या लेटलतीफ कारभारामुळे शेकडा अडीच टक्क्यांच्या व्यवहारातून सध्या लाखोंची उलाढाल होत आहे. असे असले तरी या व्यवहारात मात्र शेतकरीच नाडला जात आहे.कापूस उत्पादक काही कास्तकारांनी सातबारा आधार कार्ड, पासपोर्ट फोटो व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्याने चुकाऱ्यांना वेळ होत असल्याचे सीसीआयच्यावतीने सांगण्यात येत आहे. येथील केंद्राच्यावतीने सीसीआयच्या अकोला कार्यालयाकडे अद्यापही कापसाचे देयक न पाठविल्यामुळे चुकाऱ्यांबाबतची अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे नगदी व्यवहारासाठी दलालांना शेकडा अडीच टक्के कटनी देवून कापसाचे व्यवहार होत आहे.यासाठी बाजार समितीचे आवारात शंभरच्या घरात दलालांनी गर्दी केल्याचे दिसून येते. त्यांच्या मार्फत दररोज लाखोंच्या व्यवहाराची उलाढाल होत आहे. या सर्व प्रकारात कास्तकार नाडला जात आहे. मंगळवारपर्यंत देवळी केंद्रावर खासगी व्यापाऱ्यांच्यावतीने २३ हजार ७०६ क्विंटल व सीसीआयच्यावतीने २१ हजार ६५२ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. सीसीआयची खरेदी उशीरा सुरू झाल्याने खासगी व्यापाऱ्यांच्या तुलनेत खरेदी कमी झाली.सीसीआयचेवतीने कापसातील आद्रता पाहुन प्रती क्विंटल ५५५०, ५४९४, ५४३९ व ५३२८ पर्यंतचे भाव दिले जात आहेत. खासगी व्यापाºयांच्यावतीने ५,३३० ते ५००० पर्यंतचे भाव दिले जात आहेत. सीसीआयचे चुकारे मिळण्यास विलंब होत असल्याने याचा फायदा खासगी व्यापारी व दलालांना होत आहे. आधीच परतीच्या पावसामुळे कास्तकार अडचणीत सापडला आहे. कापसाच्या त्या प्रमाणात उतारे नाही तर सोयाबीनचे पीक अरजले नाही. अशा स्थितीत त्याची आर्थिक कोंडी झाली आहे. कापसाचे पीक पावसात सापडल्याने तसेच यातील आद्रतेमुळे भावबाजीत शेतकरी नाडला जात आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता अधिकाºयांनीही योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.नियोजनशून्य कारभाराचा फटकासीसीआयच्यावतीने बºयापैकी भाव मिळत असले तरी या कार्यालयाच्या नियोजन शुन्यतेमुळे शेतकºयांचे चुकारे मिळण्यास विलंब होत असल्याची ओरड सध्या होत आहे. अकोला कार्यालयाकडे टप्प्याटप्प्याने देयक पाठविली जात नसल्याने गेल्या सोळा दिवसांपासूनचे चुकारे थकले आहेत. सीसीआय प्रशासनाने याकडे लक्ष देवून तातडीने योग्य पाऊल उचलण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.
दोन आठवड्यापासून सीसीआयचे चुकारे थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 06:00 IST
कापूस उत्पादक काही कास्तकारांनी सातबारा आधार कार्ड, पासपोर्ट फोटो व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्याने चुकाऱ्यांना वेळ होत असल्याचे सीसीआयच्यावतीने सांगण्यात येत आहे. येथील केंद्राच्यावतीने सीसीआयच्या अकोला कार्यालयाकडे अद्यापही कापसाचे देयक न पाठविल्यामुळे चुकाऱ्यांबाबतची अनिश्चितता वाढली आहे.
दोन आठवड्यापासून सीसीआयचे चुकारे थकले
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या अडचणीत भर : कटनीच्या व्यवहारातून लाखोंची उलाढाल