शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

देवळी तालुक्यात दोन हत्या

By admin | Updated: September 9, 2016 02:14 IST

टाकळी (चणाजी) येथे बहिणीला मारहाण करताना विरोध करणाऱ्या साळीची बुधवारी रात्री, तर सोनोरा (ढोक) येथे जुन्या वादातून इसमाची गुरूवारी सकाळी हत्या करण्यात आली.

टाकळी व सोनोरा येथील थरार : साळीवर केले वारदेवळी/विजयगोपाल : टाकळी (चणाजी) येथे बहिणीला मारहाण करताना विरोध करणाऱ्या साळीची बुधवारी रात्री, तर सोनोरा (ढोक) येथे जुन्या वादातून इसमाची गुरूवारी सकाळी हत्या करण्यात आली. एका पाठोपाठ घडलेल्या या दोन थरारांमुळे तालुका हादरला. प्रेमिला दिवाकर भस्मे (२०) रा. टाकळी (चणाजी) व गोविंदा चंफत ठाकरे (५०) रा. सोनोरा (ढोक), अशी मृतकांची नावे आहेत. दोन्ही हत्येतील आरोपींना देवळी व पुलगाव पोलिसांनी गजाआड केले.सुमेध आनंद मून हा कोणताही कामधंदा करत नव्हता. अशातच त्याला जुगाराचा नाद असल्याने तो नेहमी पत्नीला त्रास देत होता. आई, वडिलांच्या घरून पैसे आणण्यासाठी धमकावून मारहाण करायचा. तो टाकळी येथे सासऱ्याच्या घरापासून काही अंतरावरच राहत असल्याने त्याचे नेहमी येणे-जाणे होते. बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास सुमेधने पत्नीला सासऱ्याच्या घरी ओढत नेऊन सासू समोर मारहाण केली. सासुने मध्यस्थी केली असता त्यांनाही ओढताण करून मारहाण केली. सर्वांना कापून टाकण्याची धमकी दिली. मृतक प्रेमिला दिवाकर भस्मे (२०) ही घरी टीव्ही पाहत होती. बहिणीला नेहमी होणारी मारहाण असह्य झाल्याने तिने त्याला विरोध केला. यामुळे चवताळलेल्या सुमेधने प्रेमिलावर सुरीने वार केले. यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी देवळी पोलिसांनी आरोपी सुमेध आनंदराव मून रा. टाकळी (चणा) याच्यावर भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करीत अटक केली. प्रेमिला सुस्वभावी व शिक्षित युवती होती. तिने बारावीनंतर डी. फॉर्मची परीक्षा उत्तीर्ण केली होती. नोकरीच्या शोधात ती वर्धा येथे राहत होती. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी ती टाकळी येथे सणासाठी आली होती. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. दुसरी घटना सोनोरा (ढोक) येथे घडली. जुन्या वादातून एकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना गुरूवारी सकाळी ८ वाजता घडली. गोविंद चंफत ठाकरे (५०) रा. सोनोरा (ढोक) असे मृतकाचे नाव आहे. पोळ्याच्या दिवशी गोविंद ठाकरे व गजानन चंद्रभान नागपुरे (३५) यांच्यात वाद झाला होता. यावेळी गोविंदने गजाननला मारहाण केली होती. यामुळे दोघांमध्ये वैर आले होते. यातच गोविंदने गुरूवारी सकाळी गजाननचे दुसऱ्या वस्तीतील घर गाठून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तो शिव्या देत त्याच्या घरात शिरला. यामुळे संतापलेल्या गजाननने त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून धारदार शस्त्राने वार केले. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पुलगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले. या प्रकरणी गजानन चंद्रभान नागपुरे, मंगेश नागपुरे (२७), चंद्रभान नागपुरे व माधुरी गजानन नागपुरे (३०) यांच्याविरूद्ध कलम १४७, १४८, १४९, ३०२, ३०७ अन्वये गुन्हा दाखल करीत चौघांनाही अटक केली. पुढील तपास सुरू आहे.(प्रतिनिधी/वार्ताहर)