शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘जावेद’कडून गावठी बनावटीच्या ‘पिस्टल’सह दोन जिवंत काडतूसं केली जप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 05:00 IST

जावेद खान मेहबूब खान पठाण, रा. आनंदनगर हा मागील काही दिवसांपासून कंबरेला पिस्टल बांधून गावात फिरत असल्याची माहिती शहर ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी जावेद पठाण याच्यावर  पाळत ठेवणे सुरू केले. बुधवारी जावेद पठाण हा बोरगाव मेघे परिसरात ‘पिस्टल’चा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत पसरवीत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘पिस्टल’चा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या सराईत गुन्हेगारास शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेत सिद्धार्थनगर परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून गावठी बनावटिच्या ‘पिस्टल’सह दोन जिवंत काडतूस जप्त करीत जावेद पठाण विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.जावेद खान मेहबूब खान पठाण, रा. आनंदनगर हा मागील काही दिवसांपासून कंबरेला पिस्टल बांधून गावात फिरत असल्याची माहिती शहर ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी जावेद पठाण याच्यावर  पाळत ठेवणे सुरू केले. बुधवारी जावेद पठाण हा बोरगाव मेघे परिसरात ‘पिस्टल’चा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत पसरवीत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी लगेच आपली टीम बोरगाव मेघे परिसराकडे वळविली असता सिद्धार्थनगर परिसरात जावेद धुमाकूळ घालताना दिसून आला. पोलिसांनी क्षणाचाही  विलंब न करता सापळा रचून त्याच्या सभोवताल घेराव घालून जावेदला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी बनावटीची ४० हजार रुपये किमतीची ‘पिस्टल’ आणि २ हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काडतूस  असा एकूण ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पाटील, सचिन इंगोले, संजय पंचभाई, दीपक जंगले, सुनील मेंढे, राजेंद्र ढगे, श्याम सलामे यांनी केली असून पुढील तपास सलाम कुरेशी हे करीत आहेत.

‘जावेद’वर विविध गंभीर गुन्हे दाखल जावेद पठाण हा दारुविक्रेता असून त्याच्यावर लूटमार, खुनाचा प्रयत्न, हाणामाऱ्या आदी सारख्या विविध गंभीर गुन्हे यापूर्वी देखील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेले आहेत. हा सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

यापूर्वीही पिस्टल केली हाेती जप्त जावेद पठाण याला गुन्हे शोध पथकाने यापूर्वीदेखील पिस्टल बाळगून असताना अटक केली होती. पोलिसांनी  त्याच्यावर तीन वर्षांपूर्वी तडीपारीचा प्रस्ताव दाखल केला होता. जावेद हा सुमारे दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपारदेखील होता. गुन्हेगारी जगतात जावेदचे प्रस्थ वाढत चालले असून पोलिसांनी दखल घेत कठोर कारवाई करण्याची गरज आज निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस