शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पढेगावात दोन शेतकऱ्यांनी फुलविली केळीची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 23:43 IST

तालुक्यातील पढेगाव येथील शेतकरी सुभाष घायवट यांनी तीन एकर शेतात पवनारचे केळी उत्पादक शेतकरी कुंदन वाघमारे यांच्या मार्गदर्शनात केळी लागवड केली. सद्यास्थित केळीची बाग चांगलीच बहरली आहे.

ठळक मुद्देशेतकरी प्रगतीच्या मार्गावर : शेतीतील नवीन प्रयोग केला यशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : तालुक्यातील पढेगाव येथील शेतकरी सुभाष घायवट यांनी तीन एकर शेतात पवनारचे केळी उत्पादक शेतकरी कुंदन वाघमारे यांच्या मार्गदर्शनात केळी लागवड केली. सद्यास्थित केळीची बाग चांगलीच बहरली आहे. जिल्ह्यात सेलू तालुका केळी उत्पादनात अग्रेसर असला तरी वर्धा तालुक्यातील पढेगाव येथील सुभाष घायवट यांनी तीन एकर शेतामध्ये २० एप्रिलला ४ हजार ५०० केळीचे रोपटे लावलीत. या रोपट्याकरिता त्यांना ७४ हजार रूपये मोजावे लागले. सदर रोपटे जळगाव येथील टीश्यू कल्चर मधून आणण्यात आली. तसेच ड्रीपचा खर्च दीड लाख रूपये तर एक लाख रूपयाचे शेणखत टाकण्यात आले. लागवड व निंदन खर्च २० हजार रूपये झाला. आतापर्यंत एकूण खर्च जवळपास साडे चार ते पाच लाख रूपये खर्च झाला आहे, असे घायवट ‘लोकमत’शी बोलताना सांगत होते. रासायनिक खतामध्ये १०-२६-२६ व १२-६१, आणी पोटॅश, युरीया, मॅग्नेशीयम, बोरान आदी खताचे द्रावण करून ड्रीपच्या सहाय्याने केळीच्या झाडाला पुरविल्या जाते. महिन्यातून ७ ते ८ वेळा केळीच्या झाडाला गुळ, बेसन, दही व एम, सोलेशन आदीचे द्रावन करून ड्रीपद्वारे प्रत्येक केळीच्या झाडाला पुरविल्या जाते. सदर वस्तुचे मिश्रण करण्याकरिता ड्रामाचा वापर केला जात आहे व महिन्यातून दोन वेळा झाडांना पुरविण्यात येतात. केळीची लागवड करायला पाच महिन्याचा कालावधी झाला आहे. पण केळीच्या झाडांनी १० ते १२ फुटाची उंची गाठली आहे हे विशेष. तसेच पढेगाव येथीलच शेतकरी विनोद सातपुते यांनी सुध्दा तीन एकर शेतात केळीची लागवड केली आहे. व त्यांनी सुध्दा याच पध्दतीचा अवलंब करून कुंदन वाघमारे यांचे मार्गदर्शन घेतले. सध्या स्थित यांची केळी बाग चांगलीच बहरली आहे. एकरी ३ ते ४ लाख रू. उत्पन्न होईल अशी आशा दोन्ही शेतकºयांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात केळीचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती केळी उत्पादक शेतकरी कुंदन वाघमारे यांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती