शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

आठवड्यातील दोन दिवस गटसचिव राहणार सेलूत

By admin | Updated: May 27, 2014 23:54 IST

तालुक्यातील ४२ सहकारी संस्था अंतर्गत येणार्‍या शेतकर्‍यांची सहकारी सोसायटीचे कर्ज नसल्याच्या दाखल्यासाठी संस्थेचे गटसचिव मिळत नसल्याने उन्हातान्हात पायपीट सुरू होती. त्यामुळे कर्ज

सेलू : तालुक्यातील ४२ सहकारी संस्था अंतर्गत येणार्‍या शेतकर्‍यांची सहकारी सोसायटीचे कर्ज नसल्याच्या दाखल्यासाठी संस्थेचे गटसचिव मिळत नसल्याने उन्हातान्हात पायपीट सुरू होती. त्यामुळे कर्ज नसल्याचा दाखला घेण्यासाठी शेतकर्‍यांची ससेहोलपट होत होती. याबाबत ‘लोकमत’ने २६ मे रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. त्याची गंभीर दखल घेत जिल्हा देखरेख सहकारी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत तलमले यांनी सर्व गटसचिवांना दर मंगळवार व शुक्रवारी सेलू येथे एकाच ठिकाणी बसून शेतकर्‍यांना नाहरकत प्रमाणपत्र व त्यांची इतर कामे अडवणूक न करता करण्याचा आदेश दिला आहे. ‘लोकमत’ने त्रस्त शेतकर्‍यांच्या अडचणीला वाचा फोडली. जिल्हा देखरेख सहकारी संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी जयंत तलमले यांनी आदेश काढून सर्व गटसचिवांनी सेलूचा आठवडी बाजार असलेल्या मंगळवार व शुक्रवारलाही सेलूत एकाच ठिकाणी सर्व गटसचिवांनी बसून शेतकर्‍यांच्या अडचणी दूर करण्याचा आदेश दिला आहे. आता शेतकर्‍यांना प्रमाणपत्रासाठी गटसचिवाचा शोध घेत भटकण्याची वेळ येणार नाही. शेतकर्‍यांना वेळीच जर नाहरकत प्रमाणपत्र मिळाले तर त्याला कर्ज घेणे सोपे होईल. (तालुका प्रतिनिधी)

शेतकर्‍यांना सहकारी सोसायटीचे कर्ज नसल्याचे प्रमाणपत्र मिळाले की ते बघून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपले प्रमाणपत्र देते. सहकारी सोसायटीचे गटसचिव पगार नियमीत होत नसल्याने व सहकारी बँक अवसायनात निघाल्याने हतबल झाले व त्यांचे कामात लक्ष लागत नाही. त्यामुळे ठरलेल्या दिवशी मुख्यालयी हजर मिळत नव्हते. शेतकर्‍यांना हंगामाच्या तोंडावर सहकारी बँक डुबल्याने राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेणे क्रमप्राप्त ठरत आहे. यासाठी सहकारी संस्थेचा कर्ज नसल्याचा दाखला अत्यावश्यक आहे. त्या दाखाल्यासाठी गटसचिवाच्या शोधात शेतकरी फिरत होते; मात्र त्यांचा पत्ता लागत नव्हता.