शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 18:26 IST

स्थानिक अंबिका चौकातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांना रविवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दोन्ही दुकानातील साहित्य कोळसा झाल्याने व्यावसायिकांचे सुमारे १७ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

ठळक मुद्देलाखोंचे नुकसानअंबिका चौकातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: स्थानिक अंबिका चौकातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांना रविवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दोन्ही दुकानातील साहित्य कोळसा झाल्याने व्यावसायिकांचे सुमारे १७ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना सुमारे पाच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.प्राप्त माहितीनुसार, आशीष डोंगरे रा. कृष्णनगर व अनिल डाफे रा. नालवाडी यांच्या मालकीचे स्थानिक अंबिका चौक परिसरात व्यावसायिक प्रतिष्ठान आहे. याच दुकानांना रविवारी रात्री उशीरा आग लागल्याचे परिसरातील काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांसह वर्धा न.प.च्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वर्धा नगर परिषद, देवळी नगर परिषद, पुलगाव नगर परिषद आणि भूगाव येथील उत्तम गलवा कंपनीच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी अग्निशनम बंबासह घटनास्थळ गाठले. तसेच आगीवर पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. आगीने बघता-बघता सदर दोन्ही व्यावसायिक प्रतिष्ठानातील साहित्याला आपल्या कवेत घेत रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. अग्निशमन दलाच्या बंबांनी सुमारे १५ फेऱ्या केल्या. सकाळी ५ वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. अचानक लागलेली ही आग इतकी भीषण होती की आगीच्या दुरवर ज्वाळा दिसून येत होत्या. या घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे.सकाळी उशिरापर्यंत धुमसली आगरविवारी रात्री उशीरा लागेली आग सकाळी ११.३० वाजतापर्यंत धुमसत होती. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर अग्निशमन दल तेथून निघून गेले. पण, सकाळी अकरा वाजताच्या सुमारास पुन्हा आग वाढल्याने अग्निशमन दलाचा एक बंब आला. त्यानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात आले.

टॅग्स :fireआग