शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामासाठी आणलेल्या रेतीच्या एकाच ढिगावर दोनदा दंड

By admin | Updated: July 24, 2016 00:24 IST

घराच्या बांधकामांसाठी विकत घेतलेल्या रेतीच्या साठ्यावर कारवाई करता येत नाही.

आष्टी (श.) : घराच्या बांधकामांसाठी विकत घेतलेल्या रेतीच्या साठ्यावर कारवाई करता येत नाही. असे असले तरी शहरात तसेच तालुक्यात अशाच रेतीसाठ्यावर कारवाई होताना दिसून येत आहे. येथील एका रेतीच्या साठ्यावर तर दोनवेळा दंड आकारण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. गतवर्षी घर बांधकाम करण्यासाठी विकत घेतलेल्या २००० फुट (२०ब्रास) रेतीवर तहसीलदारांनी ६४ हजार रुपये दंड आकारला. त्याच रेतीच्या ढिगावर यावर्षी आणखी दोन लाख ४ हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम त्वरित भरा अन्यथा सातबारावर चढविली जाईल, असा अजब आदेश तहसीलदारांनी काढला. या प्रकरणी तक्रारकर्त्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन पाठवून घर बांधकाम करणाऱ्यांना तहसीलदार नाहक त्रास देत असून कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. नवीन आष्टी वसाहतीत राहणारे अनिल दिवाकर कोहळे यांनी नवीन प्लॉट विकत घेतला. मुलांच्या शिक्षणासाठी खेडेगाव सोडून आलेल्या कोेहळे यांनी घर बांधकामासाठी मागील वर्षी २० ट्रॅक्टर रेती घाटधारक अनिल मानकर यांच्याकडून विकत घेतली. या रेतीवर घराचे बांधकाम सुरू करण्यापूर्वीच गतवर्षी ६४ हजार रुपये दंडाची रक्कम आकारण्यात आली. बांधकामाकरिता रेतीसाठा परवानगीची गरज नाही, म्हणून कोहळे यांनी उत्तर दाखल केले. असे असताना लिलाव करण्याची तंबी देत त्यांना ६४ हजार रुपये दंड भरण्यास भाग पाडले. यानंतर यावर्षी अनिल कोहळे यांना तहसीलदारांनी अवैध रेतीसाठा असून लिलाव करण्याची तंबी दिली. तलाठ्यांनी घर बांधकामासाठी रेती असल्याचे सांगितले; पण काहीही ऐकून न घेता तहसीलदार गजभिये यांनी २ लाख ४ हजार रुपये नव्याने रेती चोरी केल्या प्रकरणी दंड आकारला. हा एकच प्रकार नसून बांधकामासाठी आणलेल्या रेतीवरच कारवाई केली जात असल्याचे दिसून येते. दंडाची रक्कम सात दिवसांत न भरल्यास सातबारावर नोंद करण्याचा आदेश केला. सदर आदेश अत्यंत चुकीचा असल्याचे मत वरिष्ठांनी व्यक्त केले. तहसीलदार गजभिये यांच्याकडून होत असलेल्या अनागोंदीची लेखी तक्रार विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. तहसीलदारांना त्वरित निलंबित करावे, अन्यथा उपोषण करणार असल्याचा इशाराही कोहळे यांनी निवेदनातून दिला.(तालुका प्रतिनिधी) रेती घाटावरील पोकलँडवर कार्यवाहीस टाळाटाळ तालुक्यातील भिष्णूर, वाघोली या दोन्ही रेतीघाटात खुलेआम पोकलँडने रेतीचा उपसा सुरू आहे. दिवसाला शेकडो ब्रास रेती उपसली जात आहे. याकडे तहसीलदार फिरकूनही पाहत नाही; पण घर बांधकामासाठी आणलेल्या रेतीवर त्वरित कारवाई केली जाते. यामुळे नागरिकांत संतापाची लाट पसरली असून याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. घर बांधकामाकरिता आणलेल्या रेतीची जप्ती करता येत नाही. सर्वसामान्य जनतेवर अन्याय व्हायला नको, अधिकाऱ्यांना समजावून सांगतो. प्रशासनात वैयक्तिक आकस नकोच. आदेशावर अपील अद्याप आलेली नाही. - मनोहर चव्हाण, उपविभागीय महसूल अधिकारी, आर्वी.