तरोडा येथील घटना : आरोपीला अटकहिंगणघाट : दुचाकीने गावाला सोडून देण्याचे म्हणत एका महिलेवर जबरदस्ती केल्याची घटना तरोडा येथे घडली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अंकुश उर्फ सोम्या महादेव सलामे (३६) रा. सावली (सास्ताबाद) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना शुक्रवारी उघड झाली असून अंकुश याला शनिवारी अटक करण्यात आली आहे. पोलीस सुत्रानुसार, पीडित महिला तरोडा बसस्थानकाजवळ उभी होती. यावेळी अंकुश सलामे तिच्याजवळ आला. तिला वर्धेला दुचाकीने सोडून देतो, असे सांगून आपल्या दुचाकीवर बसवून घेतले. त्यानंतर पारडी बेड्याजवळील नाल्याजवळ दुचाकी थांबवून त्या महिलेला जबरीने दारू पाजली व मारहाण केली. शिवाय याच नाल्याजवळच्या गवतात तिच्यावर दोन वेळा अतिप्रसंग केल्याची तक्रार महिलेने पोलिसांत केली. सदर घटनेनंतर अंकुश याने पीडित महिलेचा मोबाईल व नगदी दोन हजार रुपये असा एकूण २,४०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेला. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला असून ठाणेदार शैलेश साळवी तपास करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)
युवकाकडून महिलेवर दोनदा अतिप्रसंग
By admin | Updated: September 4, 2016 00:29 IST