शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार एकर केळीच्या बागेतून बावीस लाखांचे उत्पन्न; पवनारच्या शेतकऱ्याचे धाडस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 14:17 IST

पवनार येथील युवा शेतकऱ्याने केवळ साडेचार एकर शेतात तब्बल २२ लाख रुपयांचे उत्पादन घेत विक्रमच केला आहे. या शेतकऱ्याने केळीची बाग फुलविली आहे.

ठळक मुद्दे२८ किलो वजनाचा एक घड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पारंपरिक पिके सोडून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे. यातूनच युवा शेतकरी अन्य शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण करीत असल्याची उदाहरणे आहेत. सध्या पवनार येथील युवा शेतकऱ्याने केवळ साडेचार एकर शेतात तब्बल २२ लाख रुपयांचे उत्पादन घेत विक्रमच केला आहे. या शेतकऱ्याने केळीची बाग फुलविली आहे.पवनार येथील शेतकरी कुंदन वाघमारे यांनी ५ मार्च २०१७ रोजी आपल्या साडे चार एकर शेतात केळीची लागवड केली होती. केळीचा बागायतदार तालुका म्हणून ओळख असलेल्या सेलूतून केळीचे पीक हद्दपार झाल्याची ओर होत आहे. असे असताना वाघमारे यांनी पवनार येथील आपल्या शेतात केळीची बाग तयार करण्याची किमया साध्य केली आहे. अकरा महिने परिश्रम घेतल्यानंतर त्यांना विक्रमी उत्पादन घेता आले आहे. सध्या त्यांच्या साडे चार एकर शेतात केळीची ६ हजार ८०० झाडे आहेत. प्रत्येक झाडाला केळीचे घड लागलेले आहेत. एका घडाचे वजन सुमारे २८ किलो झाले आहे. सध्या बाजारपेठेत केळीच्या घडाला १२ रुपये किलोप्रमाणे भाव मिळत आहेत. एकूण हिशेब लक्षात घेतला तर त्यांना तब्बल २२ लाख ८४ हजार रुपयांचे उत्पन्न या साडे चार एकर शेतातून मिळणार आहे.शेतकऱ्यांनी आधुनिक शेती केल्यास उत्पादन व जीवनमान उंचावता येते, हे वाघमारे यांनी सिद्ध केले आहे. पारंपरिक पिकांची कास धरून त्यांना केवळ साडे चार एकर शेतात कधीही एवढे उत्पन्न घेता आले नसते; पण केळीची बाग फुलविण्याचे धाडस केल्याने केवळ वर्षभरात त्यांना २२ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होऊ शकले आहेत. वाघमारे यांनी शासकीय नोकरी सोडून शेती पत्करली; पण अन्य शेतकरी पारंपरिक पिकांवरच भर देत असल्याने नापिकीचा सामना करावा लागतो. अन्य शेतकऱ्यांनी सुविधा प्राप्त करून घेत आधुनिक शेतीची कास धरणे गरजेचे झाले आहे.

प्रयोगशीलता हवीपारंपरिक पद्धतीने शेती केल्यास शेतकऱ्याला फारसे उत्पन्न मिळत नाही; पण शेतीत प्रयोगशीलता गरजेची आहे. विविध प्रयोग राबवून व्यवसाय म्हणून शेती केल्यास शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून जीवनमान उंचाविणे शक्य होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांनी अनुकरण करणे गरजेचे आहे.

टॅग्स :agricultureशेतीPavnarपवनार