शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १५३.७८ कोटी वळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 22:15 IST

सन २०१७ मध्ये गुलाबी बोंडअळीने कपाशी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. इतकेच नव्हे तर त्यावर्षीलाच तुडतुड्याच्या प्रादुर्भावाचा चांगलाच आर्थिक फटका धान उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता. त्यावर शासनाने सदर नुकसानग्रस्तांसाठी शासकीय मदत जाहीर केली होती.

ठळक मुद्देतुडतुड्यासह गुलाबी बोंडअळीचे अनुदान वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सन २०१७ मध्ये गुलाबी बोंडअळीने कपाशी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. इतकेच नव्हे तर त्यावर्षीलाच तुडतुड्याच्या प्रादुर्भावाचा चांगलाच आर्थिक फटका धान उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता. त्यावर शासनाने सदर नुकसानग्रस्तांसाठी शासकीय मदत जाहीर केली होती. त्या अनुषंगाने १५३.७८ कोटींची रक्कम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर ती एकूण तीन टप्प्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १०० टक्के वळती करण्यात आली असल्याचे सांगण्यात येते.प्राप्त माहितीनुसार, २०१७ मध्ये गुलाबी बोंडअळीने तसेच तुडतुड्यामुळे वर्धा तालुक्यातील ३० हजार ७७९, सेलू तालुक्यातील २६ हजार ३६७, देवळी तालुक्यातील २९ हजार ५९१, हिंगणघाट तालुक्यातील ३५ हजार १६०, समुद्रपूर तालुक्यातील ३२ हजार ६६७, आर्वी तालुक्यातील २१ हजार ५८२, आष्टी तालुक्यातील १६ हजार ४९९ तर कारंजा (घा.) तालुक्यातील २० हजार ३०७ शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले होते.कृषी विभाग आणि महसूल विभागाने पाहणीअंती वर्धा जिल्ह्यातील २ लाख २५ हजार ८९.८८ क्षेत्रावरील नुकसान झाल्याच्या विषयावर शिक्का मोर्तब केला होता. त्यानंतर सरकारकडे सदर नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी निधीची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने १७ मार्च २०१८ व ८ मे २०१८ च्या शासन निर्णयानुसार निधी मंजूर झाल्यानंतर तो जिल्हा प्रशासनाला मिळाला. त्यानंतर तीन टप्प्यात त्याचे वितरण करण्यात आले आहे. असे असले तरी काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अजूनही सदर अनुदानाची रक्कम वळती झाली नसल्याची ओरड होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.२ लाख १२ हजार ९५२ शेतकऱ्यांना दिलासासर्वेक्षणाअंती जिल्हा प्रशासनाने २ लाख १२ हजार ९५२ शेतकऱ्यांना शासकीय अनुदानासाठी पात्र ठरवित त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अहवाल शासनला पाठविला होता. त्यानंतर निधी मंजूर होत तो जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.७९६ रुपयांची कपातजिल्ह्यातील २ लाख १२ हजार ९५२ शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अहवाल तयार करून १५३ कोटी ७८ लाख ८७ हजार ७९६ रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने केली होती. परंतु, शासनाने १५३ कोटी ७८ लाख ८७ हजार रुपये मंजूर करून तितकाच निधी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. एकूणच ७९६ रुपयांच्या निधीची कपात करण्यात आली आहे.