शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदी बंद असल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 04:40 IST

दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारच्या कापूस पणन महासंघाची व सीसीआयची कापूस खरेदी सुरू न झाल्याने शेतक-यांना कापूस विक्रीसाठी अडचण निर्माण झाली आहे.

 वर्धा : दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारच्या कापूस पणन महासंघाची व सीसीआयची कापूस खरेदी सुरू न झाल्याने शेतक-यांना कापूस विक्रीसाठी अडचण निर्माण झाली आहे. विदर्भात अनेक भागात दिवाळीच्यापूर्वी कापूस निघण्यास सुरूवात होते. शेतकरी दिवाळीला कापूस विक्री करून पैसे मिळवितो. मात्र यंदा केंद्र सरकारच्या कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडियाने राज्यात कापूस खरेदी केंद्र सुरू केले नाही. त्यामुळे व्यापाºयांची खेडा खरेदी जोरात सुरू झाली आहे. यात शेतकºयांना अत्यल्प भाव देवून नगदी पैशाने कापूस खरेदी करण्यात येत आहे.राज्यात उत्पादन होणा-या कापसात ७८ टक्के कापूस एकट्या विदर्भात उत्पादन होतो. विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात कापसाचे पीक घेतले जाते. बरेच शेतकरी मृग नक्षत्राच्यापूर्वी धुळपेरणी करीत असल्याने त्यांच्याकडे दसºयानंतर कापूस निघण्यास सुरूवात होते. यंदा कापसाचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता कृषी खात्याने वर्तविली आहे. अनेक शेतकºयाच्या घरी कापूस आलेला आहे. मात्र सरकारचे कापूस खरेदीबाबत धोरण अद्यापही ठरलेले नाही. १९ सप्टेंबर रोजी कापूस पणन महासंघाची मुंबई येथे वार्षिक आमसभा पार पडली. या आमसभेत कापूस खरेदीबाबत निर्णय घेण्यात आला. यात कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडिया राज्यात कापूस खरेदी करेल व कापूस पणन महासंघ नोडल संस्था म्हणून कमिशन तत्वावर काम करेल, असे ठरविण्यात आले. दिवाळीपूर्वी सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू होईल, अशी आशा शेतकºयांना होती. परंतु राज्यात कोठेही कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे शेतक-यांना आता व्यापा-यांना कापूस विकण्याची पाळी आली आहे. शेतक-यांकडून अल्प दराने व्यापारी कापूस घेत आहे. यंदा कापसाचा भाव ५ हजार रूपये क्विंटलच्यावर राहण्याची शक्यता आहे. कापूस उत्पादन करणाºया जगातील अनेक देशात या वर्षी वादळामुळे व नैसर्गिक अडचणीमुळे कापसाचे उत्पादन घटलेले आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेतील कापसाला मोठी मागणी राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सीसीआयचे कापूस खरेदी तत्काळ सुरू करण्याची गरज होती. मात्र केंद्र सरकारची कमालीची उदासिनता याबाबत दिसून येत आहे. 

टॅग्स :cottonकापूसMaharashtraमहाराष्ट्र