शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

भारतीय स्टेट बँकेत दरोड्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 22:01 IST

येथील भारतीय स्टेट बँकेत चोरट्यांकडून दरोडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रयत्नात बँकेत असलेल्या अत्याधुनिक यंत्राच्या सहायाने पोलिसांना माहिती पोहोचल्याने चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न फसला.

ठळक मुद्देसेंसरमुळे पोलिसांना मिळाली सूचना : आवाज होताच चोरटे पसार

आॅनलाईन लोकमतसमुद्रपूर : येथील भारतीय स्टेट बँकेत चोरट्यांकडून दरोडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रयत्नात बँकेत असलेल्या अत्याधुनिक यंत्राच्या सहायाने पोलिसांना माहिती पोहोचल्याने चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न फसला. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडला.पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता चोरटे दोराच्या सहायाने बँकेत वर चढले व गेट तोडून स्ट्राँगरूमपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले. शिवाय त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे वायर आणि हायअलर्ट प्रणाली नष्ट केल्याचेही दिसून आले. मात्र स्ट्राँग रूममध्ये असलेल्या सेंसरमुळे चोरट्यांचा डाव फसल्याचे समोर आले. शहरातील बँक फोडण्याचा प्रयत्न झाल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.२५ जानेवारी रोजी रात्री १.१२ वाजता समुद्रपूर पोलीस ठाण्याचा फोन वाजला की बँकमध्ये काहीतरी झाले. शिवाय तसा संदेशही आला. संदेश येताच सुरक्षा रक्षत जाधव हे बँक परिसरात पोहचले असता त्यांना बँकेचे मुख्य शेटर बंद दिसले. यावेळी त्यांनी इकडे तिकडे पाहले असता काहीच दिसले नाही. बँकेत उंदरांचा उद्रेक झाल्याने संदेश आला असावा असे त्यांना वाटले. याच वेळी पोलिसांनी बँकेत पोहोचत बँकेचे शेटर उघडले असता बँकेचे चॅनल गेट तोडल्याचे लक्षात आले.२६ जानेवारीला सकाळी वर्धेवरून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. या वेळी श्वान हा बँक परिसरात १०० फुट जात मागे परत येत होता. यावरुन असे निर्दशनात येते की चोरटे आपले वाहन बँक परिसरातुन हिंगणघाट-उमेरड मार्गावर उभे ठेऊन ते तिथुनच पसार झाले असावे असा संशय आहे.बँकेच्या बाहेरील परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता दोन चोरटे मंकीक्याप घालून असल्याचे निदर्शनात येते; मात्र पुढे त्यांनी वायर कापल्याने फुटेज दिसत नाही. यावरून चोरटे सराईत असल्याचे दिसून येते. यामुळे पोलिसांच्या हाती काहीच सुगावा लागला नाही. या प्रकरणी समुद्रपूर पोलिसात गुन्हा दाखल केला असून तपास ठाणेदार प्रविण मुंडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक प्रविण लिंगाडे, पोलिस उपनिरीक्षक उमेश हरणखेडे, उपनिरीक्षक अशोक चंहांदे, चांगदेव बुरीले, चन्द्रशेखर रोहनकर, भगत, अजय घुसे, चेतन पीसे शेखर नेहारे, राजू जयसिंगपुरे, वीरेंद्र कांबळे, रंजना झिलपे, शीतल धबर्डे, आदी करीत आहेत.सीसीटीव्हीचे वायर कापलेबँकेत पाहणी केली असता चोरट्यांनी बँक इमारतीवर दोराचे सहायाने चढुन छतावरील जिन्याचे लोंखडी दार गँस कटरच्या सहायाने कापून प्रवेश केल्याचे निर्दशनात आले. चोरट्यांनी सर्व प्रथम हायअलर्ट करणाऱ्या आलारामचा वायर कापला व नंतर तीन सीसीटीव्ही कॅमेºयाचे वायर कापूस बँकेच्या स्ट्रॉगरुमपर्यंत पोहचण्याची मजल मारली. मात्र येथे स्ट्रॉग रुमच्या सेंसरने पोलीस व सुरक्षा रक्षकाला अलर्ट केल्याने बँकेतील मोठी चोरी टळली.बँकेत २५ लाखांची रोखच्बँक प्रभारी शाखा व्यवस्थापक अनिल उमरेडकर यांनी दिलेल्या माहीती नुसार बँकमध्ये या वेळी २५ लाख रुपये होते.