शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
4
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
5
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
6
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
7
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
8
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
9
जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
10
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
11
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
13
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
14
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
15
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
16
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
17
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
18
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
19
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
20
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

ईश्वराकडे नेणारा खरा संत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:35 IST

समाजाच्या सुखात आपले सुख आणि दु:खात आपले दु:ख जो बघतो. शिवाय आपल्या सुख-दु:खात जो सामान्य राहून भाविकांना ईश्वराकडे जाण्याचा खरा मार्ग सांगतो; तोच खरा साधू-संत आहे, अशी माहिती भागवत कथा प्रवक्ता जयाकिशोरीजी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देजयाकिशोरीजी : पत्रपरिषदेत दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समाजाच्या सुखात आपले सुख आणि दु:खात आपले दु:ख जो बघतो. शिवाय आपल्या सुख-दु:खात जो सामान्य राहून भाविकांना ईश्वराकडे जाण्याचा खरा मार्ग सांगतो; तोच खरा साधू-संत आहे, अशी माहिती भागवत कथा प्रवक्ता जयाकिशोरीजी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.जयाकिशोरीजी पुढे म्हणाल्या, नुकतेच आपण कलकत्ता येथून बी.कॉम. पूर्ण केले आहे. आपण ठिकठिकाणी ‘नानीबाईचा मायरा’ व ‘श्रीमद् भागवत कथा’ नागरिकांना समजावून सांगतो. फार कमी वयात एक कीर्तन ऐकून आपण याकडे वळलो. कूमारविष्णू यांचे ‘कभी प्यासे को पाणी पिलाया नही... बाद अमृत पिला नेसे क्या फायदा’ हे भजन आपल्या हृदयाला स्पर्श करून गेले. दहावीपर्यंत या कामासाठी फार कमी सवड मिळत होती. मात्र, महाविद्यालयात गेल्यानंतर थोडी जास्त सवड या कार्यासाठी आपणाला मिळाली असून समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे कार्य आपण सध्या करीत आहोत. कथेच्या माध्यमातून जे दान आम्हाला प्राप्त होते त्यातून आम्ही दिव्यांग बांधवांना मदत करतो. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी आपण कथेच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. बाल वयात व प्रत्येक घरातील तरुणांवर आई-वडील व घरातील वृद्ध योग्य संस्कार करीत असतात;पण सध्या वृद्धाश्रमात घरातील वृद्धांना रवाना केले जात आहे. हा प्रकार निंदनिय आहे. घरातील वातावरण भक्तीमय असावे. यामुळे चुकीच्या कामांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आळा बसतो. युवकांनी नेहमीच आई-वडिलांसह घरातील वयोवृद्धांचा आदर करावा, असेही त्या म्हणाल्या.नारायण सेवा संस्थेचे कुंजबिहारी मिश्रा म्हणाले की, कथेच्या माध्यमातून प्राप्त होणारे दान नारायण सेवा संस्थेत जमा होते. शासकीय निधी व दानातून मिळालेल्या पैशातून संस्थेने आतापर्यंत ३ लाख २७ हजार दिव्यांग बांधवांवर शस्त्रक्रिया केली. तर १२ हजार ५०० दिव्यांग बांधव शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहे. यावेळी विपीन चोरडीया यांची उपस्थिती होती.