शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने दुचाकीवरील दोघांना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:53 IST

ऑनलाईन लोकमत वर्धा : नागपूरकडून सावंगी (मेघे) च्या दिशेने जाणाºया भरधाव ट्रकने दुचाकीवरील दोघांना चिरडले. हा अपघात सिंदी (मेघे) भागातील शांतीनगर चौकात बुधवारी सायंकाळी घडला. विष्णू जावळे व प्रकाश खराबे दोन्ही रा. न्यू रेल्वे कॉलनी, असे मृतकांची नावे आहे.प्राप्त माहितीनुसार, नागपूरकडून सावंगी (मेघे)कडे जाणाºया सीजी १० आर ५३७९ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने ...

ठळक मुद्देशांतीनगर चौकातील अपघात : चालक ट्रक सोडून पसार

ऑनलाईन लोकमत वर्धा : नागपूरकडून सावंगी (मेघे) च्या दिशेने जाणाºया भरधाव ट्रकने दुचाकीवरील दोघांना चिरडले. हा अपघात सिंदी (मेघे) भागातील शांतीनगर चौकात बुधवारी सायंकाळी घडला. विष्णू जावळे व प्रकाश खराबे दोन्ही रा. न्यू रेल्वे कॉलनी, असे मृतकांची नावे आहे.प्राप्त माहितीनुसार, नागपूरकडून सावंगी (मेघे)कडे जाणाºया सीजी १० आर ५३७९ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने एमएच २७ एजी ५६१७ क्रमांकाच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात दुकाचीवरील विष्णू जावळे व त्याचा सहकारी घटनास्थळीच ठार झाला. अपघात होताच ट्रक चालकाने ताब्यातील वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान, काही सुजान नागरिकांनी पाठलाग करून ट्रक नागठाणा चौकात अडविला. यावेळी संधी साधून ट्रक चालक अस्लम अन्सारी रा. बंगाल हा पसार झाला; पण नागरिकांनी ट्रकचा क्लिनर इमाम अन्सारी रा. झारखंड याला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याची चमू घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह व अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेत पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले असून चालकाचा शोध सुरू आहे.दीड किमीपर्यंत दुचाकी नेली फरपटतअपघात होताच ट्रक चालकाने घटनास्थळावरून वाहनासह पळ काढला; पण दुचाकी ट्रकच्या समोरील भागात अडकली होती. ती दुचाकी घटनास्थळापासून दीड किमी अंतर नागठाणा चौकापर्यंत आरोपी ट्रक चालकाने फरपटत नेली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनीही लगेच धाव घेत परिस्थिती हाताळली.

टॅग्स :Accidentअपघात