शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात सुक्या मेव्याचा ट्रक उलटला; गावकऱ्यांनी ८० लाखांचा ऐवज केला लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 11:40 IST

Dryfruits Wardha News काजू, बदाम आदी ड्रायफूड्स भरुन जाणारे वाहन अचानक देववाडी गावाजवळ उलटल्याने गावकऱ्यांनी काजू,बदाम आदी १३ टन सुकामेव्यावर डल्ला मारला.

ठळक मुद्देसत्याग्रही घाटात ट्रक उलटलादंगल पथकाकडून देववाडी गावात घरोघरी तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: काजू, बदाम आदी ड्रायफूड्स भरुन जाणारे वाहन अचानक देववाडी गावाजवळ उलटल्याने गावकऱ्यांनी काजू,बदाम आदी १३ टन सुकामेव्यावर डल्ला मारला. हा अपघात नागपूर ते अमरावती मार्गावरील सत्याग्रही घाटात घडला. सुकामेवा भरुन एक ट्रक अमरावतीकडे जात असताना ट्रकचालकाचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने देववाडी गावानजीक अचानक ट्रक रस्त्याकडेला उलटला. या ट्रकमध्ये काजू, बदाम आदी सुकामेवा भरुन होता. ही बाब गावकऱ्यांना लक्षात येताच गावकऱ्यांनी चक्क दिवाळीच्या निमित्ताने सुकामेव्यावर डल्ला मारीत काजू, बदामाची पोती आपआपल्या घरी नेली. गावकऱ्यांनी चक्क ट्रकमधील ८० लाख रुपये किंमतीचा १३ टन सुकामेवा चोरुन नेल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. याची माहिती तळेगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघात झालेल्या ठिकाणाची पाहणी करुन पंचनामा केला. उलटलेला ट्रक काढण्याचे प्रयत्न सुरु आहे. या अपघातामुळे लगतच्या गावांतील नागरिकांसह बघ्यांची गर्दी झाली होती. सुदैवाने या अपघातात कुणाचीही जीवीतहानी झाली नाही.

दंगल पथकाला केले पाचारणल्लसुकामेव्यावर गावक ऱ्यांनी डल्ला मारल्याचे पोलिसांना समजताच तळेगाव पोलीस ठाण्यातील दंगल पथकाला अपघातस्थळी पाचारण करण्यात आले. दंगल पथकाने संपूर्ण देववाडी परिसर पिंजून काढला.

७५ टक्के माल केला हस्तगतल्लसुकामेवा भरुन असलेला ट्रक उलटल्याने गावकऱ्यांनी ट्रकमधील काजू, बदामाची पोती आपआपल्या घरी नेली. दरम्यान दंगल नियंत्रण पथकातील पोलिसांनी देववाडी गावातील नागरिकांच्या घरोघरी जात तपासणी केली असता नागरिकांच्या घरात सुकामेव्याची पोती मिळून आली. पोलिसांनी अनेकांच्या घरातून सुमारे ७५ टक्के माल हस्तगत केल्याची माहिती आहे. अजूनही पोलिसांचा तपास सुरु असून संपूर्ण माल मिळाल्याशिवाय तपासणी बंद होणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी