शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतामानाने संत्राबागा करपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:39 IST

गत पंधरा दिवसांपासून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. शिवाय विहिरींच्या पाण्याची पातळ खाली जात आहे. काही विहिरींनी तसेच कुपनलिका व नदी- तलाव तळ दाखवत असल्याने संत्राउत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या अडचणीत भर : कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कसेलगाव (लवणे) : गत पंधरा दिवसांपासून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. शिवाय विहिरींच्या पाण्याची पातळ खाली जात आहे. काही विहिरींनी तसेच कुपनलिका व नदी- तलाव तळ दाखवत असल्याने संत्राउत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. सध्या उष्णतामानामुळे संत्रा, मोसंबी आदींची झाड करपत असल्याने ती जगविण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शनाची गरज आहे. शिवाय तशी मागणी परिसरातील संत्रा उत्पादकांची आहे.गेल्या वर्षी पाऊस बºयापैकी राहिला. परंतु, आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात जमिनीतून पाण्याचा उपसा करण्यात आल्याने संध्या या भागातील भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. विहिरी, कुपनलिकांनी तळ गाठल्यामुळे बागा वाचविण्यासाठी जीवाचे रान शेतकऱ्यांना करावे लागत आहे. काही बागायतदार पाणी विकत घेऊन टँकरने ते विहिरीत टाकत आहेत. तर हेच विहिरीतील पाणी सध्या या संत्रा व मोसंबीच्या झाडांना देऊन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून होत आहे. मे महिना अर्ध्यावर आला आहे. त्यामुळे सुर्यनारायणही चांगलाच आग ओकू पाहत आहे. त्यामुळे संत्राचे झाड खाली माना टाकत आहेत. यंदा वेळीच पाऊस न झाल्यास फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.जोरदार पाऊस येण्यासाठी अजुनही एक महिन्याचा कालावधी बाकी असल्यामुळे पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे बागा वाचवायच्या कशा, असा प्रश्न बागायतदारांपुढे उभा आहे. या भागातील बागा वाढत्या उन्हामुळे करपत असल्याने कृषी विभागाच्यावतीने सदर बागायतदार शेतकऱ्यांना तात्काळ योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. तशी शेतकऱ्यांची मागणीही आहे.शासकीय मदतीची मागणीसंत्रा, मोसंबी, बागावर नेहमीच येणाऱ्या किडीमुळे बागायतदारांना महागडी किटकनाशके विकत घेवून त्यांची फवारणी करावी लागते. शिवाय मजूरीच्या दरातही मोठी वाढ झाल्याने बागायतदार मेटाकुटीस आला आहे. गत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीटीमुळे संत्रा बागायतदारांना मोठा आर्थिक फटकाच सहन करावा लागला. वाढत्या उन्हासह पाण्याचा कमतरतेमुळे बागायतदार शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून त्यांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.