वर्धा : स्वातंत्र्य संग्राम सेनानी, गांधीवादी व विचारवंत आणि लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांना १८ व्या स्मृती दिनी पवनार येथील संकल्पस्थळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सर्वस्तरावरील चाहता वर्ग उपस्थित होता. बाबूजींचे वर्धा जिल्हा जनसमूहाशी असलेल्या ऋणानुबंधातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.गुरूदेव प्रचारक बा. दे. हांडे यांनी ग्रामगीतेतील ‘अंत्यसंस्कार’ या २२ व्या अध्यायाचे वाचन केले. महाराजांनी मृत्यू हे उत्सव असल्याचे सांगितले आहे. जे समाज कार्यात स्वत:ला वाहून घेतात ते चिरस्मरणी राहतात. असेही महाराजांनी या अध्यायात म्हटले आहे. समता चोरडिया यांनी राष्ट्रसंतांच्या अमर जीवन संदेशाचे वाचन केले. राष्ट्रवंदनेने सभेची सांगता झाली. याप्रसंगी संकल्पस्थळी बा.दे. हांडे, अगडे गुरूजी, विनोद व ज्योत्स्रा चोरडिया, भूजंगराव वानखेडे, गिरीश काशीकर, जानराव लोणकर, अशोक किनगावकर, प्रफुल्ल लुंगे, नरेश गावंडे, प्रा. अजित धोटे, मदन देशपांडे, भारत आगलावे, रामचंद्र बेले, गोविंद गायकवाड, चोरडिया परिवारातील सदस्य विनय, सीमा, विपीन, समता, मेघा, मनन, खुशी, नितीन जैन, रंजित कांबळे, राहुल जाऊरकर, पवन घिमे आदींनी बाबूजींना आदरांजली वाहिली.(कार्यालयीन प्रतिनिधी) वर्धा जिल्हा लोकमत कार्यालयात बाबूजींना आदरांजलीस्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती दिनानिमित्त वर्धा जिल्हा लोकमत कार्यालयात भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी शाखा प्रमुख उमेश शर्मा, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी राजेश भोजेकर, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी श्याम उपाध्याय, रूपेश खैरी, प्रशांत हेलोंडे, पराग मगर, श्रेया केने, किशोर मानकर, नीलेश उडदे, दीपक कामडी, सखी मंच जिल्हा संयोजिका प्रियंका मोहोड, धीरज ठावरे, नीता राऊत, उमेश सरदारे, अमर कोठेकर उपस्थित होते.
संकल्पस्थळी बाबूजींना श्रद्धांजली
By admin | Updated: November 26, 2015 02:15 IST