शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सोशालिस्ट चौकात सामाजिक संघटनांनी अर्पण केली श्रद्धांजली, शहीद जवान अमर रहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 16:56 IST

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 38 जवान शहीद झाले.

वर्धा : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 38 जवान शहीद झाले. दहशतवाद्यांकडून झालेला हा प्रकार निंदनीय असून, त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी वर्धेतील विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी स्थानिक सोशालिस्ट चौकात दुपारी एकत्र येत ‘शहीद जवान अमर रहे’ अशा घोषणा दिल्या. यावेळी उपस्थितांनी मौन पाळून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.जम्मू-कश्मीर येथील पुलवामा येथे जम्मूवरून श्रीनगरच्या दिशेने जाणा-या जवानांना टार्गेट करून हा हल्ला करण्यात आला. यात 38 जवान शहीद झाले असून देशात सुरक्षा जवानांवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. या घटनेमुळे देशात सर्वच स्तरातून  संताप व्यक्त केला जात असून, या भ्याड हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात असून दहशतवाद्यांना मदत करणा-या पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारत सरकारने तातडीने पाऊल उचलावीत, अशी मागणी यावेळी विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिका-यांनी केली. याप्रसंगी विविध संघटनेच्या पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी दोन मिनिट मौन पाळून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.या उपक्रमात प्रहारचे शहर प्रमुख विकास दांडगे, वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे, माजी सैनिक संघटनेचे श्याम परसोडकर, बजरंग दलचे अमित ठाकूर, घनश्याम अहेरी, पतंजली महिला संघटना, जय हिंद फाऊंडेशन, नॅशनल युथ युनियनसह आदी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. घोषणाबाजी केल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी सोशालिस्ट चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी दुचाकी रॅली काढून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना सादर केले.पाकिस्तानच्या प्रतीकात्मक राष्ट्रध्वजाची होळीजम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ स्थानिक सोशालिस्ट चौकात विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी एकत्र येत दहशतवाद्यांना मदत करणा-या पाकिस्तानच्या प्रतीकात्मक राष्ट्रध्वजाची होळी केली. शिवाय पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे छायाचित्र जाळून आपला रोष व्यक्त केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादचे नारे लावत शहीद जवान अमर रहे अशाही घोषणा दिल्या. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आंदोलनस्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला