शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
3
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
4
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
5
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
6
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
7
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
8
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
9
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
10
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
11
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
12
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
13
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
14
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
15
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
16
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
17
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
18
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
19
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
20
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर

आदिवासी दैवत रावण पूजा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:03 IST

बिरसा मुंडा क्रीडा संकुल आर्वी नाका आयटीआय टेकडी येथे आदिवासी दैवत राजा रावण पूजन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रावण पूजनानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देआयटीआय टेकडीवरील कार्यक्रम : युवकांना केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बिरसा मुंडा क्रीडा संकुल आर्वी नाका आयटीआय टेकडी येथे आदिवासी दैवत राजा रावण पूजन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रावण पूजनानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बापूराव उईके पाटील तर अतिथी म्हणून जि.प. सदस्य सरस्वती मडावी, प्रा. शिवाजी इथापे, मनोहर पंचारिया, किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे, मंगेश शेंडे, जि.प. सदस्य धनराज तेलंग, गजेंद्र सुरकार, प्रा. नूतन माळवी, अमिर अली अजानी, ज्ञानेश्वर ढगे, मदन चावरे, प्रशांत कुत्तरमारे, राजेश मडावी, तार खंडाते, निर्मला सलामे, मेघा उईके, लता टेकाम, मनोहर पंधरे, ज्ञानेश्वर मडावी आदी उपस्थित होते.काकडे यांनी चुकीचा इतिहास सांगून बहुजन समाजाच्या युवकांची दिशाभूल करीत आहे. धर्मा-धर्मात, जाती-जातीत तेढ निर्माण करीत आहे. लिखानाद्वारे समाजप्रबोधन करणाºया व्यक्तींचे प्राण घेत त्यांचे विचार संपविण्याचा प्रयत्न होत आहे. महात्मा रावण यांचा दैदिप्यमान इतिहास असतानाही चुकीचा इतिहास सांगून बहुजन समाजाच्या युवकांच्या हाताने त्यांचे दहन करून आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जात आहे. याबाबत शासनने दहन करणाºयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. सरस्वती मडावी यांनी सर्व आदिवासी समाजाने संघटित होऊन अन्यायाविरूद्ध लढा देण्याची वेळ आली आहे. ज्या संघटना वा राजकीय पक्ष रावण दहन करीत असतील त्यांची भेट घेत त्यांचे मतपरिवर्तन करायचा प्रयत्न करावा. याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन केले.तेलंग यांनी आदिवासी समाज अजून शिक्षणाच्या प्रवाहात मागे आहे. आदिवासी समाजातील युवकांनी शिक्षणाचा लाभ घेवून महत्त्वाच्या पदावर जावे. याशिवाय समाजाचा विकास होणार नाही. त्याचप्रमाणे शासन आरक्षणाच्या बाबतीत अतिशय धोकादायक निर्णय घेतले असून शिष्यवृत्ती मिळणार नाही, याप्रमाणे कायदे बनवित आहेत. यामुळे आदिवासी समाजाने गावोगावी रावण पूजनाचा कार्यक्रम घेऊन समाज जागृती करावी, असे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत मसराम यांनी, संचालन हरिदास टेकाम यांनी केले तर उपस्थितांचे आभार अशोक धुर्वे यांनी केले. कार्यक्रमाला राजू मडावी, चंद्रभान खंडाते, चेतन पेंदाम, चंद्रशेखर मडावी, रामेश्वर आडे, नरेंद्र तोडासे, किशोर पेंदाम, नागोराव मसराम, विष्णू जुगनाके, मडावी, नंदकिशोर बिसने, विजय मरस्कोल्हे, अमृत मडावी, राजेंद्र मसराम, दादाराव इवनाथे, शंकर उईके, भरत कोवे, सुनील सलामे, दिगांबर पेंदाम, किसन कौरती, विठ्ठल इवनाथे, विनोद गेडाम, सचिन नराते, दिवाकर उईके, आशा टेकाम, सुनिता सयाम, अनिला मसराम, रंजना सलामे, योगिता युवनाथे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.