शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

झाडे वाढली; फुले, बोंडांचा पत्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:41 IST

विश्वासाचे बियाणे म्हणून ख्यातीप्राप्त महाबीजचे कपाशी बियाणे एका शेतकºयासाठी कर्दनकाळ ठरले आहे.

ठळक मुद्देमहाबीजचे बियाणे निघाले बोगस : अडीच लाखांचे पीक बुडाले, भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.) : विश्वासाचे बियाणे म्हणून ख्यातीप्राप्त महाबीजचे कपाशी बियाणे एका शेतकºयासाठी कर्दनकाळ ठरले आहे. तीन एकरातील एकाही झाडाला फुल व बोंडे लागली नाहीत. यामुळे हतबल झालेल्या शेतकºयाने तक्रार केली; पण अधिकाºयांनी ढुंकूनही पाहिले नाही. यामुळे अडीच लाखांचे पीक बुडाले असून अख्खा संसारच उघड्यावर आला आहे. आता नुकसान भरपाई वा आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकºयाने केली आहे.बोरखेडी येथील शेतकरी रामदास चंदीवाले यांनी तीन एकर शेतात कपाशीची लागवड केली. यासाठी महाबीजचे तीन पॉकेट बियाणे खरेदी केले. झाडांची उंची झपाट्याने वाढली; पण फुल, बोंड लागलीच नाही. यामुळे रामदास व त्यांची मुले व्यथित झालीत. त्यांनी महाबीजच्या दुकानात जाऊन माहिती दिली. यावर तक्रार करा, असा सल्ला दुकानदारांकडून देण्यात आला.यानंतर याप्रकरणी महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक, खरेदी-विक्री संघाकडे तक्रार करण्यात आली. तालुका कृषी अधिकाºयांनी तक्रार मिळताच पंचनामा केला. याचा अहवाल त्वरित पाठविला जाईल, अशी ग्वाही देण्यात आली. रामदास यांनी पिकाचा विमा काढलेला नाही. यामुळे त्यांना काहीही नुकसान भरपाई मिळणार नाही, असे सांगण्यात आले. या प्रकारामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शासनाचेच बियाणे बोगस निघत असल्याने शेतकºयांमध्ये असंतोष पसरला आहे. यापूर्वी काही शेतकºयांचे बियाणे बोगस निघाले होते. ते प्रारंभी बदलून देण्यात आले; पण आता पीक काढणीवर असतानाही कपाशीला बोंडेच आली नसल्याने मोठे नुकसान होत आहे.वर्षभरापासून मेहनत घेऊन तथा कर्जबाजारी होऊन अशी वेळ आल्याने शेतकºयाचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी वा आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकºयाने निवेदनातून केली आहे. निवेदनाच्या प्रती वरिष्ठ अधिकाºयांना पाठविण्यात आल्या आहेत. यावर काय कारवाई होते, याकडे शेतकºयाचे लक्ष लागले आहे.पीक विमा न काढल्याने नाकारली मदतमागील हंगामात पीक विमा योजनेत शेतकºयांची फसगत झाली. यामुळे अनेक शेतकºयांनी यंदा पीक विमा काढलेला नाही. आता बियाणे बोगस निघाल्याने शेतकºयाचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकºयाला महाबीजने वा शासनाने नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे; पण विमा काढला नसल्याचे कारण पूढे केले जात आहे. शासनाने याकडे लक्ष देत महाबीजने भरपाई देणे गरजेचे आहे.रामदास चंदीवाले या शेतकºयाने तीन एकरात महाबीज बियाणे लावले आहे. कपाशीचे झाड पूर्ण वाढले; पण फुले व बोंडे लागली नाहीत. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाली आहे. यात खते व फवारणीचे प्रमाण बरोबर दिले नसेल. त्यामुळे वाढ झाली व फळ धारणेची प्रक्रिया खुंटली असेल. याची चौकशी सुरू आहे.- अजय फुलझेले, व्यवस्थापक, महाबीज, वर्धा.