शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यातील स्मशानभूमीत तिरडीच्या बांबूपासून वृक्षसंरक्षणाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 12:38 IST

वर्धेतील स्मशानभूमित मृतदेह आणलेल्या तिरड्या जाळण्यास मनाई करण्यात आली आहे. तिरड्यांच्या बांबूपासून वृक्षसंरक्षक कठडे तयार करून वृक्षसंवर्धनाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनागरिकांनी दिला चांगला प्रतिसाद कपडे जाळण्यासही नकार मृतदेहाच्या अंगावर टाकून आणलेल्या साड्या, शॉल आदी कपडे जाळणे टाळण्यासंदर्भातही पालिकेच्यावतीने सूचना करण्यात आल्या आहेत. नागरिकांकडून त्यालाही प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

रूपेश खैरी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मृत्यू हे मानवी जीवनाचे अंतिम सत्य आहे. या सत्याशी जोडण्यात आलेल्या कर्मकांडातून समाजाला मुक्त करण्याकरिता गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी त्यांच्या अख्ख्या हयातीत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या याच मूल्यांचा आधार घेत वर्धेतील स्मशानभूमित मृतदेह आणलेल्या तिरड्या जाळण्यास मनाई करण्यात आली आहे. तिरड्यांच्या बांबूपासून वृक्षसंरक्षक कठडे तयार करून वृक्षसंवर्धनाचा चांगला उपक्रम सुरू करण्यात आला आहे.मृत्यूनंतर दोन बांबू आणि १४ काड्यांच्या तिरडीवर मृतदेह ठेवून तो स्मशानभूमित नेण्यात येतो. प्रथेनुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. त्यानंतर तिरडीचे बांबू आणि त्यातील काड्याही जाळण्यात येतात. या बांबूंचा इतरत्र उपयोग होऊ शकतो अशी कल्पना वर्धेच्या नगराध्यक्षांच्या डोक्यात आली आणि त्यांनी स्मशानभूमित तिरडीचे बांबू जाळण्यास मज्जाव घातला. त्यांच्या या निर्णयाला वर्धेकर नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. यातून जमा झालेल्या बांबूपासून वृक्षसंवर्धक कठडे आणि येथे येणाऱ्या नागरिकांना बसण्याकरिता निवारे निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे.स्मशानभूमित हिरवळ निर्माण करण्याकरिता याच बांबूपासून निर्माण करण्यात आलेल्या कठड्यातून वृक्षांचे सर्वधन करण्यात येत आहे. यामुळे वर्धा नगर परिषदेने घेतलेला हा निर्णय सर्वांकरिता एक दिशादर्शक ठरणार आहे.

वृक्षसंरक्षणाचा खर्च वाचलासर्वत्र हिरवळ निर्माण करण्याकरिता शासनाकडून वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. वर्धेत यंदा पाच कोटी झाडे लावण्यात येणार आहेत. केवळ वृक्षारोपण करून हिरवळ निर्माण होणार नाही तर त्यांच्या संवर्धनासह रक्षणाचीही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. खर्चाची बचत होणार असल्याने वर्धा नगर परिषदेने घेतलेल्या या निर्णयातून वृक्षसंरक्षण करणे सहज शक्य झाले आहे.तिरडी निर्माण करताना दोन नवे बांबू आणि काड्या विकत आणल्या जातात. अंत्ययात्रा स्मशानभूमित पोहोचल्यानंतर तासाभरापूर्वी विकत आणलेली ही लाकडे जाळण्यात येतात. या बांबूपासून वृक्षसंरक्षक कठडे निर्माण करणे सहज शक्य असल्याचे दिसले. यातून हा निर्णय घेतला. वर्धेत या निर्णयाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.- अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा.

टॅग्स :Earthपृथ्वी