शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

विविध योजनांतर्गत वृक्ष लागवड; पण संवर्धनाला बगल

By admin | Updated: May 30, 2014 00:19 IST

शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत आजगाव जुने व नवे येथे वृक्ष लागवड करण्यात आली. वायगाव ग्रामपंचायतीमार्फत मुख्य रस्त्याच्या कडेला लावलेली ही झाडे सध्या वाळत असल्याचे दिसते.

वायगाव (नि.) : शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत आजगाव जुने व नवे येथे वृक्ष लागवड करण्यात आली. वायगाव ग्रामपंचायतीमार्फत मुख्य रस्त्याच्या कडेला लावलेली ही झाडे सध्या वाळत असल्याचे दिसते. यामुळे वृक्ष लागवड योजनांवरच प्रश्नचिन्ह लागले आहे. शासनाच्या योजनेनुसार एक व्यक्ती, एक वृक्ष ही संकल्पना राबविण्यात आली. वृक्ष लागवडीवर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करण्यात आले. पंचायत समितीमार्फत सर्व ग्रा.पं. च्या माध्यमातून ही योजना राबविण्यात आली. यात वायगाव (नि.) ग्रा.पं. ने ही वृक्ष लागवड केली. वायगाव अंतर्गत येणार्‍या वॉर्ड क्र. ३ मधील आजगाव नवीन व आजगाव जुने येथे रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड करण्यात आली. रोजगार हमी योजनेंतर्गत लाकडी कमचीचे कठडेही लावले; पण झाडाला पाणी कोण देणार, हा प्रश्नच होता. संवर्धनाकडे ग्रा.पं. ने दुर्लक्ष केल्याचेच दिसते. झाडांना पाणी न मिळाल्याने बहुतांश झाडे वाळली आहेत. हे दृष्य पाहता शासनाची योजना राबवायची म्हणून झाडे लावण्यात आल्याचे दिसते. ग्रामपंचायत प्रशासनाकडे झाडाला पाणी देण्याकरिता लोखंडी टाकी उपलब्ध आहे. ही टाकी सध्या धुळखात पडली असताना झाडाला पाणी देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसते. टाकी विकत घेतल्यापासून तिचा वापरच करण्यात आला नसल्याचेही समोर आले आहे.  यामुळे झाडांना पाणी देणार्‍या मजुराची मजुरी तर कागदोपत्री काढली जात नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. झाडाला पाणी दिले जात असेल तर  बहुतांश झाडे का वाळत आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. शतकोटी वृक्ष लागवड योजनेत लावलेली झाडे वाळत असल्याने योजनाच धोक्यात आली आहे. ग्रा.पं. तसेच जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)