लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील एका औषधीच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराच्या १३ वर्षीय मुलाला डेंग्यूने ग्रासले. त्यावर उपचार करण्यासाठी जवळचे सर्व पैसे खर्च केले. अशातच त्याला कावीळही झाल्याने मोठे संकट उभे ठाकले होते. घरची जेमतेम परिस्थिती त्यात नशीबानेही थट्टा चालविली होती. अखेर रुग्णासांठी कार्य करणाºया सेवाभावी संस्थेने मदतीचे आवाहन करुन स्वत: आर्थिक मदत करुन उपचार करण्याचा मार्ग मोकळा केला. परिणामी या बालाकावर यशस्वी उपचार होऊन तो आज सुखरुप घरी पोहचला.उमेश चंदेल हे एका औषधीच्या दुकानात काम करतात. त्यांचा मुलगा यश याला सुरवातील डेंग्यू झाला. घरची परिस्थिती जमतेम असल्याने होईल तेवढे उपचार केले. परंतू प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्याची प्रकृती आणखीच खालावून लागली. त्यामुळे त्याला नागपूरच्या पाटील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. एकीकडे डेंग्यूशी झुंज देत असतांना सोबतच कावीळ या आजारानेही ग्रासले त्यामुळे उपचाराचा खर्च कुठून करावा, हा यक्षप्रश्न उभा ठाकला होता. याची माहिती जिव्हाळा संस्थेला मिळताच त्यांची शहानिशा करुन उपचाराकरिता ११ हजार रुपयाची मदत करुन इतरांनाही सोशल मिडीयाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद इतरांनीही मदतीचा हात पुढे केला.यातून यशवर योग्य उपचार करण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला रुग्णालयातून सुटी झाली आहे. यामुळे यशच्या परिवाराने सर्वांचे आभार मानले आहे.
रुग्णांच्या जिव्हाळ्यापोटी कामगाराच्या मुलावर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:17 IST
शहरातील एका औषधीच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराच्या १३ वर्षीय मुलाला डेंग्यूने ग्रासले. त्यावर उपचार करण्यासाठी जवळचे सर्व पैसे खर्च केले. अशातच त्याला कावीळही झाल्याने मोठे संकट उभे ठाकले होते. घरची जेमतेम परिस्थिती त्यात नशीबानेही थट्टा चालविली होती.
रुग्णांच्या जिव्हाळ्यापोटी कामगाराच्या मुलावर उपचार
ठळक मुद्देडेंग्यू व कावीळच्या आजाराने बालक ग्रस्त : संस्थेकडून मदतीचा हात