शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

ट्रॅव्हल्स-दुचाकीच्या अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 23:30 IST

ट्रॅव्हल्स-दुचाकीच्या धडकेत दोन जण घटनास्थळीच ठार झाले. अपघात होताच दुचाकीने पेट घेतल्याने दुचाकीची राखरांगोळीच झाली. हा भीषण अपघात रविवारी रात्री ११. ४५ वाजताच्या सुमारास वर्धा-यवतमाळ मार्गावरील भिडी शिवारात दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या कॉम्लेक्स जवळ झाला.

ठळक मुद्देभिडी शिवारातील घटना : दुचाकीची झाली राखरांगोळी
<p>लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : ट्रॅव्हल्स-दुचाकीच्या धडकेत दोन जण घटनास्थळीच ठार झाले. अपघात होताच दुचाकीने पेट घेतल्याने दुचाकीची राखरांगोळीच झाली. हा भीषण अपघात रविवारी रात्री ११. ४५ वाजताच्या सुमारास वर्धा-यवतमाळ मार्गावरील भिडी शिवारात दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या कॉम्लेक्स जवळ झाला.प्राप्त माहितीनुसार, एम.एच. ४० ए.टी. ०१८७ या क्रमांकाची वातानुकुलीत ट्रॅव्हल्स यवतमाळकडे जात होती. याचवेळी दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात या ट्रॅव्हल्सने विरूद्ध दिशेने येणाºया एम.एच. २७ पी.सी. ८८१० क्रमाकांच्या दुचाकीला धडक दिली. यात जयप्रकाश मनोहर मेटे (४३) रा. नालवाडी व चेतन अनिल सगणे रा. बडनेरा जि. अमरावती हे दोघे जागीच ठार झाले. अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त दुचाकी सुमारे ५० फुटपर्यंत फरपटत गेली. याच दरम्यान घर्षण झाल्याने दुचाकीने पेट घेतला. अपघाताची माहिती मिळताच भिडी येथील शासकीय रुग्णालयातील डॉ. दिनेश राठोड यांनी जखमींना वैद्यकीय सेवा देण्यासाठी घटनास्थळ गाठले. त्यांनी तपासणी अंती दोघांनाही मृत घोषित केले. दरम्यान देवळी पोलिसांनीही घटनास्थळ गाठले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करून अपघात ग्रस्त वाहन ताब्यात घेतले. शिवाय दोन्ही मृतदेह शवविच्छेतनासाठी रुग्णालयात पाठविले. या घटनेची देवळी पोलिसांनी नोंद घेतली असून पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालकाला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर करीत आहेत.ट्रॅव्हल्स चालकाला केली अटकया घटनेतील आरोपी असलेल्या ट्रॅव्हल्स चालकाला देवळी पोलिसांनी अटक केली आहे. घटनेच्या नंतर अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स अनियंत्रित होत थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात घुसली. पुढील तपास सुरू आहे.भाजपा तालुकाध्यक्षांच्या वाहनाला धडक; तीन जण जखमीसमुद्रपूर - भाजपा तालुका अध्यक्षाच्या वाहनाला भरधाव असलेल्या टवेराने धडक दिली. यात तीन जण जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून हा अपघात जाम-हिंगणघाट मार्गावर झाला.भाजपा तालुकाध्यक्ष संजय डेहणे हे समुद्रपूर पं. स. कार्यालयातील आयोजित कार्यक्रम आटोपून जीवन सुर्व व कैलास टिपले यांच्यासह त्यांच्या एम. एच. ३१ वाय. ५१५० क्रमांकाच्या कारने समुद्रपूर येथून हिंगणघाटकडे जात होते.त्यांचे वाहन जाम-हिंगणघाट मार्गावरील पी.व्ही.टेक्स ट्राईल समोर आली असता मागाहून येणाºया एम.एच.३१ इ.ए.९२८७ क्रमांकाच्या टवेराने त्यांना जबर धडक दिली. या अपघातात भाजपा तालुकाध्यक्षांचे वाहन उलटले.या अपघातात भाजपा तालुका अध्यक्ष संजय डेहणे, जीवन सुर्व व कैलास हे जखमी झाल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कांढळीचे बलराम राऊत, वायगाव (गो.)चे सरपंच पांगुड यांनी घटनास्थळ गाठले.त्यांनी जखमींना त्वरित हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जीवन सुर्व यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.