शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले
2
जगप्रसिद्ध पण पुण्यात बदनाम झालेल्या पोर्शे कारच्या टीमने डेटा मिळविला; बिल्डर 'बाळा'ची कुंडली मिळणार...
3
"मी काय मूर्ख नाही, भाजपचं मोठा भाऊ"; विधानसभेच्या जागांवरुन भुजबळांची नरमाईची भूमिका
4
IPL 2024 : सोशल मीडियावर कोणाचा कल्ला? धोनी आणि मुंबई इंडियन्सचा जलवा कायम!
5
RBI नंतर LIC भरणार सरकारी खजाना, ₹३,६६२ कोटींचा डिविडेंड देण्याची केली घोषणा
6
निवडणूक निकालानंतर 'खेला होबे'..! INDIA आघाडीच्या बैठकीपासून ममता बॅनर्जी दूर का?
7
“राहुल गांधी ना सैन्यात भरती होऊ शकत, ना स्वतः काही कमावू शकत, आईवर ओझे”; भाजपाची टीका
8
प्रेमासाठी बदलला धर्म, शिफा झाली संध्या; कुटुंबीयांचा विरोध, हिंदू रितीरिवाजांनुसार केलं लग्न
9
डेरा प्रमुख राम रहीमला मोठा दिलासा, माजी मॅनेजर रणजीत हत्येप्रकरणी हायकोर्टाने निर्दोष ठरवले
10
UPI पेमेंट्स आणि ई-कॉमर्समध्ये Adani एन्ट्रीच्या तयारी; Google, Paytm ला मिळणार टक्कर
11
तेरी गली में आया भूल के...! Ananya Pandey चा KKR च्या शिलेदारांसोबत डान्स, VIDEO
12
"नात्याचा विचार करू की...", 'मित्र' पटनायक यांच्यासोबत का होऊ शकली नाही युती? PM मोदी स्पष्टच बोलले
13
“लोकसभा निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही”; अजित पवारांचे विधान चर्चेत
14
Video - ट्यूमर सर्जरीनंतर राखी सावंतची झाली वाईट अवस्था; चालणंही झालं अवघड
15
प्रशांत किशोर यांचे 'हे' ५ अंदाज ज्यानं भाजपाला दिलासा तर विरोधकांना धडकी भरली
16
मिझोराममध्ये दगडाच्या खाणीत भूस्खलन; 10 मजुरांचा मृत्यू, अन्य ढिगाऱ्याखाली अडकले
17
उंदराला मांजर साक्ष! ससूनच्या डॉक्टरांची चौकशी करणारे डॉक्टर गंभीर प्रकरणांत अडकलेले; माजी सनदी अधिकाऱ्यांचा आक्षेप
18
Fact Check : "अबकी बार 400 पार..."; असं म्हणणाऱ्या व्यक्तीचा 'तो' व्हायरल Video स्क्रिप्टेड
19
मराठमोळ्या अभिनेत्याचा कान्स फेस्टिव्हलमध्ये स्वॅग! साध्या पण रुबाबदार लूकने जिंकली मनं
20
'एलआयसी'ची मोठी तयारी! आता LIC देणार हेल्थ इन्शुरन्स; कंपनीने दिले संकेत

वाहतूक पोलिसांनी बुजविले खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:01 AM

स्थानिक बजाज चौकातील रस्ता अनेक दिवसांपासून खड्डेमय झाला होता. ते खड्डे बुजविणे क्रमप्राप्त असताना त्याकडे संबंधितांकडून दुर्लक्षच करण्यात धन्यता मानली जात होती. संभाव्य धोका लक्षात घेता वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी पुढाकार घेवून शनिवारी बजाज चौक परिसरातील जीवघेणे खड्डे खड्डे बुजविले. यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देदंड न ठोठावता टाकला मुरूम : जोपासली सामाजिक बांधिलकी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक बजाज चौकातील रस्ता अनेक दिवसांपासून खड्डेमय झाला होता. ते खड्डे बुजविणे क्रमप्राप्त असताना त्याकडे संबंधितांकडून दुर्लक्षच करण्यात धन्यता मानली जात होती. संभाव्य धोका लक्षात घेता वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी पुढाकार घेवून शनिवारी बजाज चौक परिसरातील जीवघेणे खड्डे खड्डे बुजविले. यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.बजाज चौक येथील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलाच्या रुंदीकरणाचे व सिमेंटीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. सध्या उड्डाण पुलाचे काम सुरू असले तरी गत काही महिन्यांपासून स्थानिक बजाज चौक परिसरात रस्त्याच्या मधोमध तयार झालेल्या जीवघेण्या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व वर्धा न.प.च्या बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत होते. बजाज चौक हा नेहमीच वर्दळ असणारा परिसर आहे. याच परिसरात पेट्रोलपंप, बस स्थानक तसेच भाजी बाजार आहे. परंतु, या परिसरातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांची समस्या व संभाव्य धोका लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेत सदर खड्डे बुजविले. विशेष म्हणजे, शहरातून जड वाहनास बंदी आहे. जे जड वाहन या नियमाचे उल्लंघन करताना आढळून आले त्या वाहनचालकावर दंडात्मक कारवाई न करता त्याच्याच मदतीने वाहतूक पोलीस कर्मचारी शफी उल्ला खान यांनी या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून घेतला.वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत राबविलेला उपक्रम अतिशय उत्तम आहे. पावसाळ्यापूर्वी सदर जीवघेणे खड्डे बुजविण्यात आल्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. इतकेच नव्हे तर अनुचित घटनेला आळाही घालता येईल.- दत्तात्रय गुरव, सहापोलीस निरीक्षक,वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस