शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅटरिना’ची ऐट खुणावतेय पर्यटकांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 23:42 IST

येथील बोर व्याघ्र प्रकलातील जंगल सफारीदरम्यान बच्चेकंपनी तेथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटत असून अनेक पर्यटकांकडून सध्या गाईडकडे ‘बोरची राणी’ अशी ओळख असलेल्या कॅटरिना नामक वाघिणीची एक झलक दाखविण्याची मागणी होते.

ठळक मुद्देएक झलक दाखविण्याची होते मागणी । बोर व्याघ्र प्रकल्पात मिळतोय ‘आनंद’

रितेश वालदे ।लोकमत न्यूज नेटवर्कबोरधरण : येथील बोर व्याघ्र प्रकलातील जंगल सफारीदरम्यान बच्चेकंपनी तेथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटत असून अनेक पर्यटकांकडून सध्या गाईडकडे ‘बोरची राणी’ अशी ओळख असलेल्या कॅटरिना नामक वाघिणीची एक झलक दाखविण्याची मागणी होते. वास्तविक पाहता जंगलातील काही नैसर्गिक पाणवठे आटल्याने सध्या या ऐटबाज कॅटरिनाचे दर्शन पर्यटकांना होत आहे. त्यामुळे बोर व्याघ्रप्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणी येणाºया पर्यटकांसह बच्चेकंपनीला आनंदच मिळत आहे.कॅटरिनाच्या दररोज होणाºया साईडिंगने पर्यटकांमध्ये आणि वन्यजीव प्रेमींमध्ये उत्साह निर्माण होत आहे. या ठिकाणी येणारे पर्यटक आज मला कॅटरिनाचे दर्शन होईलच असे सहज बोलताना दिसतात. रुपेरी परद्यावर जशी अभिनेत्री कॅटरिना कैफ ही तिच्या रसिकांना एका अनोख्या अदेत भारावून टाकते तशीच बोरची राणी असलेली कॅटरीना नामक वाघिण सध्या आपल्या साईडिंगने पर्यटकांना मंत्रमुग्धच करीत असल्याचे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. देशातील सर्वात छोटा व्याघ्रप्रकल्प म्हणून ओळख असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पात अंबिका आणि कॅटरिना या दोन वाघिण आहेत. तर वन विभागाने त्यांच्या कागदांवर वाघिण अंबिकाची बीटीआर टी-१ तर कॅटरीना या वाघिणीची बीटीआर टी-३ अशी नोंद घेतली आहे. या दोन्ही वाघिणींचे सध्या पर्यटकांना सहज दर्शन होत असून दिवसेंदिवस बोर व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.कॅटरिनाची माय अंबिकाकॅटरिना नामक वाघिणीचा जन्म बोर मध्येच झाला असून सध्या ती सुमारे सात वर्षांची असल्याचे सांगण्यात येते. कॅटरिनाने आतार्यंत चारवेळा छाव्यांना जन्म दिला असून तिच्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पाला १३ व्याघ्र संततीची प्राप्ती झाली आहे. बोर येथील अनेकांना भुरळ घालणारी कॅटरिनाची आईही तेथीलच सुमारे नऊ वर्षे असलेली अंबिका वाघिण असल्याचेही सांगण्यात येते.झुडपातून बघते तेव्हा पसरते शांततासध्या बोर व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांना कॅटरीना नामक वाघिणीचे दर्शन होत आहे. जंगल सफारीदरम्यान पर्यटकांची जीप पुढे गेल्यावर हळूच कॅटरीना ही झुडपातून बाहेर निघत पर्यटकांच्या जीपकडे बघते. याप्रसंगी स्मशानशांतता पसरत असून तिच्या या अंदाजामुळे येथे येणाºया पर्यटकांसह वन्यजीवप्रेमी सध्या मंत्रमुग्धच होत आहेत.

टॅग्स :TigerवाघBor Tiger Projectबोर व्याघ्र प्रकल्प