शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन हे रोजगार व महसूल देणारे क्षेत्र आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:21 IST

जगात केवळ पर्यटनावर अर्थव्यवस्था असणारी अनेक शहरे आहेत. पर्यटन क्षेत्र हे रोजगार आणि महसूल देणारे क्षेत्र असून या क्षेत्राचा जास्तीत जास्त विस्तार करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर आहे.

ठळक मुद्देमदन येरावार : तीन कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : जगात केवळ पर्यटनावर अर्थव्यवस्था असणारी अनेक शहरे आहेत. पर्यटन क्षेत्र हे रोजगार आणि महसूल देणारे क्षेत्र असून या क्षेत्राचा जास्तीत जास्त विस्तार करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर आहे. या पर्यटनाच्या माध्यमातून नाचणगावमधील प्रत्येकाच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिल्यास त्याचा जास्त  आनंद होईल,  असे प्रतिपादन पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी केले.राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून नाचणगाव येथील भोसलेकालीन सराई किल्याचे विकास काम आणि इसाई माता मंदिर सभागृह बांधकाम अशा तीन कोटी रुपयांच्या कामांचा श्रीगणेशा ना. येरावार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी आ. रामदास आंबटकर, पं.स.चे उपसभापती किशोर गव्हाळकर, नाचणगावच्या  सरपंच सविता गावंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने आदींची उपस्थिती होती.अनेकांची कुलदेवता असलेल्या इसाई मातेचे वास्तव्य असलेले गाव दुर्लक्षित राहूच शकत नाही. सदर पर्यटनस्थळी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण आग्रही आहे. या शासनाने पर्यटना क्षेत्राच्या विकासावर भर दिला आहे. तसेच शेती, कौशल्यविकास व मुद्रा योजनेच्या माध्यमातून युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. देवळीच्या एन.टी.पी.सी.प्रोजेक्टमुळे या भागात उद्योग येण्यास तयार आहे. त्यामुळे पर्यटनाच्या साथीला उद्योगांची भर पडल्यास या भागाचा विकास झपाट्यानेच होईल असे यावेळी ना. येरावार यांनी स्पष्ट केले. इसाई माता मंदिराचे काम सहा महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. याप्रसंगी आ. रामदास आंबटकर व राजेश बकाने यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पं.स. उपसभापती किशोर गव्हाळकर यांनी केले तर आभार विनोद मावळे यांनी मानले.नाचणगाव दुर्लक्षित राहणार नाहीमहाराष्ट्र शासन प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत नाचणगाव येथील भोसले काहीन सरई व इसामाना देवस्थान येथील दोन कोटी आठ लाखाच्या विकास कामाचे भूमीपूजन पर्यटन व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. नाचणगाव हे कुठल्याही परिस्थितीत विकासापासून दुर्लक्षित राहणार नाही, अशी ग्वाही ना. येरावार यांनी दिली. कार्यक्रमाला जि.प. सदस्य प्रवीण सावरकर, वैशाली येरावार, नागरी बँकचे अध्यक्ष केशव दांडेकर, पं.स. उपसभापती किशोर गव्हाळकर, राहुल चोपडे, संजय गाते, किशोर गव्हाळकर, रमेश निंबाळकर, सचिन कासार, विनोद माहुरे, संतोष तिवारी, प्रल्हाद कैकाडी, ओंकार राऊत, सुरेश हनुमंते व ग्रा.पं. सदस्य आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :tourismपर्यटन