शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

उद्या ‘ते’ गांधींनाही देशद्रोही ठरवतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 22:19 IST

सध्या विचारांचं बीजचं करपलेलं असून उथळ विधानांना ऊत आला आहे. वैचारिक मुल्ये ºहास पावत आहेत. त्यामुळे आता नव्या बियाण्यांची गरज आहे. साहित्य, संस्कृती, धार्मिकता, राष्ट्रीयत्व याच्या व्याख्याच बदललेल्या आहेत.

ठळक मुद्देश्रीपाद भालचंद्र जोशी : भा.ल. भोळे पुरस्कारांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या विचारांचं बीजचं करपलेलं असून उथळ विधानांना ऊत आला आहे. वैचारिक मुल्ये ºहास पावत आहेत. त्यामुळे आता नव्या बियाण्यांची गरज आहे. साहित्य, संस्कृती, धार्मिकता, राष्ट्रीयत्व याच्या व्याख्याच बदललेल्या आहेत. त्यामुळे विकासाच्या बाता करणारी मंडळी उद्या महात्मा गांधींनाही देशद्रोही ठरविण्यास कमी करणार नाहीत, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केले. यशवंतराव दाते स्मृती संस्थेद्वारे आयोजित डॉ. भा.ल. भोळे स्मृती पुरस्कार वितरण समारोहात ते बोलत होते.स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित या समारोहात डॉ. हरिशचंद्र थोरात, मुंबई यांना ‘मूल्यभानाची सामग्री’ या ग्रंथाकरिता डॉ. भा.ल. भोळे स्मृती वैचारिक ग्रंथ पुरस्कार प्रदान केला. ‘आंदोलन’ मासिकाच्या संपादक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनिती सुलभा रघुनाथ, पुणे यांना डॉ. भा.ल. भोळे स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर औरंगाबाद येथील प्रा. राहुल कोसंबी यांना डॉ. यशवंत सुमंत स्मृती युवा संशोधक प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. डॉ. जोशी, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी विचारपीठावर पुरस्कार समितीचे संयोजक किशोर बेडकीहाळ, विजया भोळे, संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते, उपाध्यक्ष प्रा. शेख हाशम, सचिव संजय इंगळे तिगावकर, सहसचिव प्रा. राजेंद्र मुंढे यांची उपस्थिती होती.सध्याचा काळ हा सांस्कृतिक उदात्तीकरण करण्याचा आहे. त्यातून संस्कृतीच्या पोटात काय दडले आहे, हे कळत नाही. संस्कृती ही बाजारात मिळण्याइतपत सुमार गोष्ट झाली आहे, असे मनोगत डॉ. थोरात यांनी यावेळी व्यक्त केले. जात, धर्म, लिंग यावर नवा फॅसिझम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. अशावेळी पुन्हा एकदा सर्वांनी मिळून लढण्याची गरज आहे, अशी भूमिका सुनीती सु.र यांनी मांडली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शेख हाशम यांनी केले. पुरस्कृत व्यक्तींच्या निवडीमागील निकष व परिचय किशोर बेडकिहाळ व चैत्रा रेडकर यांनी करुन दिला. संचालन प्रा. अमोल गाढवकर यांनी केले. सन्मानपत्रांचे वाचन डॉ. राजेंद्र मुंढे, रंजना दाते व संजय इंगळे तिगावकर यांनी केले. आभार प्रदीप दाते यांनी मानले. कार्यक्रमाला अ.भा.मराठी साहित्य महामंडळाचे डॉ. विलास देशपांडे, डॉ. इंद्रजित ओरके, अनिल नितनवरे, हिरण्मय भोळे, डॉ. विलास देशमुख, डॉ. तारक काटे, देवराव कासटवार, गुणवंत डकरे, डॉ. गजानन कोटेवार, अभ्युदय मेघे, प्रा. राजेंद्र गावंडे, प्रा.प्रल्हाद इंगळे, प्रा. येऊलकर, डॉ. वंदना फरसोले, महेश मोकलकर आदी उपस्थित होते.