लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकमतचे संस्थापक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त लोकमत परिवाराच्यावतीने मंगळवार २ जुलैला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असून या उपक्रमात नागरिकांसह रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.रक्ताचा एक थेंब एखाद्या व्यक्तीचे जीवन ठरू शकतो, या अनुषंगाने लोकमत परिवारातर्फे दरवर्षी बाबूजींच्या जयंतीदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. गतवर्षी या शिबिराला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तर यंदा हे शिबिर २ जुलैला स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात युवा सोशल फोरमच्या सहकार्याने सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीची चमू रक्तसंकलन करणार आहे. रक्तदात्यांनी शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन लोकमत परिवारातर्फे करण्यात आले आहे.
जवाहरलाल दर्डा जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:00 IST
लोकमतचे संस्थापक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त लोकमत परिवाराच्यावतीने मंगळवार २ जुलैला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असून या उपक्रमात नागरिकांसह रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जवाहरलाल दर्डा जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर
ठळक मुद्देलोकमत परिवार, युवा सोशल फोरमचा संयुक्त उपक्रम