शासनाचा आदेश : नव्या निर्णयानुसार कारवाईच्या सूचनापुरुषोत्तम नागपुरे आर्वीविद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दिल्या जाणाऱ्या दाखल्यावर शाळांना आता आधार क्रमांक टाकावा लागणार आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार शासनादेश शाळांना निर्गमित करण्यात आले आहेत. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व सर्वसाधारण नोंदवणी यात सुधारणा करण्याचे आदेश आहेत.शासन निर्णयानुसार सदर आदेश २०१६-१७ या शैक्षणिक सत्रापासून लागू करण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व सर्वसाधारण नोंदवही नमुन्यात ही माहिती आॅनलाईन भरणे. सर्वच शाळांना अनिवार्य केले आहे. विद्यार्थ्यांचे आयडी युडीआय क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, पूर्वीच्या शाळेत कोणत्या इयत्तेपासून शिक्षण घेत असल्याची माहिती नवीन प्रपत्रात समाविष्ट केला जाणार आहे. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक प्रमाणभूत व महत्त्वाचे दस्तावेज आहे. विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणे जातीचा दाखल व पासपापेर्ट बनविणे व इतर बाबींसाठी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र म्हणजे विद्यार्थ्यांची शाळेची परिपूर्ण ओळखच असते.सध्या माध्यमिक शाळा नियम क्रमांक १० व परिशिष्ट ८ मध्ये शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राच्या नमुना दिला आहे. परिशिष्ट १८ मध्ये सर्वसाधारण नोंदवहीचा नमुना दिलेल्या आहे. असे असले तरी शाळांमधून शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र नसल्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो; मात्र, दाखल्याचा एकच नमुना असावा, अशी मागणी जिल्हा माध्यमिक शाळा, शिक्षकेत्तर, कर्मचारी संघटनेची होती. त्यानुसार इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचा दाखल एकसारखाच एकाच नमुन्यात करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शाळा प्रशासनाने या आदेशाची दखल घेत शाळेतील विद्यार्थ्याची आधारकार्ड नोदणी व सरल आधारित सर्व प्रकारची माहिती संकलन पूर्वतयारी म्हणून शैक्षणिक सत्र २०१६-१७ करीता नोंदी करण्यासाठी करावेत, असे आवाहन जिल्हा माध्यमिक शाळा, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने केले आहे.
टिसी व नोंदवहीत सुधारणांचे आदेश
By admin | Updated: October 14, 2016 02:42 IST