शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात प्रथमच ‘टायगर’ला पिंजराबंद करण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2022 23:11 IST

वाघाच्या दहशतीत जगणाऱ्या ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन बोरची राणी अशी ओळख असलेल्या कॅटरिना  (बीटीआर-३) ची मुलगी पिंकी (बीटीआर-७) या वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश वन्यजीव विभागाच्या वरिष्ठांनी दिले आहेत. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत वन विभागाच्या  तब्बल नऊ,  तर  बोर व्याघ्र प्रकल्प प्रशासनाच्या तीन चमू पिंकी नामक वाघिणीला पिंजराबंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत;

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील सर्वांत छोटा व्याघ्र प्रकल्प म्हणून सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख. या प्रकल्पात १६ वाघांचे वास्तव्य आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन १३ हजार ८०० हेक्टर, तर बफर झोन ६७ हजार ८१४.४६ हेक्टर आहे. इतकेच नव्हे, तर जिल्ह्यातील ४०५५१.३८ हेक्टरवर नेहमीच वाघांची ‘मूव्हमेंट’ असते, तसेच जंगलाची सलगता हे बोरचे वैशिष्ट्य असून, वाघांच्या संवर्धनासाठी ते महत्त्वाचे ठरत असले तरी वाघांसाठी पोषक असलेल्या वर्ध्यात प्रथमच ‘टायगर’ला पिंजराबंद करण्याची वेळ आली आहे.वाघाच्या दहशतीत जगणाऱ्या ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन बोरची राणी अशी ओळख असलेल्या कॅटरिना  (बीटीआर-३) ची मुलगी पिंकी (बीटीआर-७) या वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश वन्यजीव विभागाच्या वरिष्ठांनी दिले आहेत. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत वन विभागाच्या  तब्बल नऊ,  तर  बोर व्याघ्र प्रकल्प प्रशासनाच्या तीन चमू पिंकी नामक वाघिणीला पिंजराबंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत; पण हिरवा शालू नेसलेल्या  जंगलात  पिंकीला पिंजराबंद करण्यासाठी लावलेल्या सापळ्यात ती अद्यापही अडकलेली नसल्याचे वास्तव आहे. ही मोहीम राबविणारे कुठल्याही अडचणीला तोंड द्यावे लागले तरी आम्ही पिंकीला पिंजराबंद करू असा विश्वास व्यक्त करीत आहेत, हे विशेष.

युनिफाईड कंट्रोलचा विषय पुढारीही घेई ना- बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनचा एकसंघ नियंत्रण (युनिफाइड कंट्रोल) चा प्रस्ताव धुळखात आहे. पण तो तातडीने मंजूर व्हावा यासाठी जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी पाठपुरवा करीत नसल्याचे वास्तव आहे. बफर झोनचे एक संघ नियंत्रण झाल्यास जंगलाशेजारील गावांना सर्वाधिक फायदा होणार आहे. शिवाय वेळीच ठोस निर्णय घेता येणार आहे.

आश्चर्यच... एकसंघ नियंत्रणाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच- बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनचा एकसंघ नियंत्रण (युनिफाइड कंट्रोल) चा प्रस्ताव ८ मे २०२० पासून धूळखात आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनचे एकसंघ नियंत्रण झाल्यास मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करता येणार आहे. या परिसराचे नियंत्रण हे वन्यजीव विभागाकडे येणार आहे; पण संबंधित वरिष्ठ अधिकारी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील टी-५ वाघिणीचा झाला होता करंट लागून सिंदीविहिरी येथे अपघाती मृत्यू- पिंजराबंद केल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील टी-५ वाघिणीला सात वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील नवरगाव परिसरात सोडण्यात आले होते. रेडिओ कॉलर लावण्यात आलेल्या या वाघिणीने नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ ५०० किमीचा प्रवास केला; पण तिचा सिंदीविहिरी परिसरात अपघाती मृत्यू झाला होता. आता मोठी खबरदारी घेत पिंकीला पिंजराबंद करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या कामात जंगल परिसरातील गावांमधील ग्रामस्थांचे सहकार्य मोलाचेच ठरणार आहे.

‘पिंकी’ देतेय दोन्ही सापळ्यांना हुलकावणी- पिंकीला पिंजराबंद करण्यासाठी जंगलात पाळीव जनावरांना बांधून दोन ठिकाणी सापळे लावण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर तब्बल बारा चमू पिंकीचे ठोस लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न करीत असून, ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरेही लावण्यात आले आहेत; पण ड्रोन कॅमेरा असो वा ट्रॅप कॅमेरे यात पिंकी वाघीण कैद झालेली नाही. शिवाय जंगलात लावण्यात आलेल्या सापळ्यांना पिंकी हुलकावणी देत आहे.

तज्ज्ञ वन्यजीव प्रेमींनी सखाेल अभ्यास करून कारणे शोधण्याची गरज- देशातील सर्वांत छोटा व्याघ्र प्रकल्प असलेला बोर व्याघ्र प्रकल्प वाघांच्या संवर्धनासाठी अतिशय सुरक्षित मानला जातो; पण याच प्रकल्पात जन्म घेऊन लहानाची मोठी होत बोरच्या कोअर आणि बफर झोनमध्ये मुक्तसंचार करणारी बीटीआर-७ (पिंकी) ही वाघीण मनुष्यासाठी अचानक कशी धोक्याची झाली याबाबतचा तज्ज्ञांनी सखोल अभ्यास करून विविध कारणे शोधण्याची गरज वन्यजीवप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :Tigerवाघ