शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

नवीन तालुका निर्मितीच्या वेळी प्रथम सिंदीला प्राधान्य देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 10:27 PM

कुठलेही राजकीय वलय नसताना स्वकर्तृत्वावर आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे देशाच्या सर्वोच्च सभागृहात पोहोचलो. सिंदी क वर्ग असूनही या गावाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नसल्यामुळे सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने सिंदीला तालुक्याचा दर्जा प्राप्त करून देऊ तसेच तालुका निर्मितीच्या वेळेस सिंदीला प्रथम प्राधान्य देऊ, अशी ग्वाही खासदार रामदास तडस यांनी दिली.

ठळक मुद्देरामदास तडस । नगर परिषदेतर्फे नागरी सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : कुठलेही राजकीय वलय नसताना स्वकर्तृत्वावर आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे देशाच्या सर्वोच्च सभागृहात पोहोचलो. सिंदी क वर्ग असूनही या गावाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नसल्यामुळे सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने सिंदीला तालुक्याचा दर्जा प्राप्त करून देऊ तसेच तालुका निर्मितीच्या वेळेस सिंदीला प्रथम प्राधान्य देऊ, अशी ग्वाही खासदार रामदास तडस यांनी दिली.स्थानिक नगरपालिकेच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार समीर कुणावार होते. नगराध्यक्ष संगीता शेंडे, उपाध्यक्ष वंदना डकरे, बांधकाम सभापती बबिता तुमाने, शिक्षण सभापती आशीष देवतळे, सभापती वनिता मदनकर, मुख्याधिकारी रवींद्र ढाके व नगरसेवक उपस्थित होते. सहा महिन्यांपासून बंद झालेल्या गाड्यांचा थांबा पूर्ववत सुरू करून दिल्याने विद्यार्थी प्रवासी मित्र मंडळातर्फे अंकिता बारई, अनुजा चरडे, पायल चहंकार, प्रणाली मदनकर, हृतिक डकरे यांनी खासदार तडस यांचे आभार व्यक्त करून सत्कार केला. आमदार समीर कुणावार म्हणाले, सिंदी शहराचा विकास करण्यासाठी शासनाने १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.या निधीतून अनेक विकासात्मक कामे केली जात असून अनेक कामे अद्याप करायची आहेत. शासनाकडून सिंदीचा कायापालट करण्यासाठी पुन्हा निधी मिळणार आहे. ड्रायपोर्टमध्ये स्थानिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याकरिता शासनस्तरावर प्रयत्न केले जाईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्ष संगीता शेंडे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर वृक्षारोपण व विविध कामांचे भूमिपूजन आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला भाजप गटनेत्या अजया साखळे, नगरसेवक अमोल बोंगाडे, वनिता सेलूकर, पुष्पा सिरसे, सुमन पाटील, प्रकाशचंद्र डफ, विलास तळवेकर, रमेश उईके, प्रकाश मेंढे, जयना बोगाडे, चंदा बोरकर, ओमप्रकाश राठी, सुधाकर घवघवें, आदी हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी रवींद्र ढाके तर संचालन व आभार प्रदर्शन भागवत पवार यांनी केले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस