शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसांपासून वाघांचा शेतात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 23:34 IST

खरांगणा वनपरिक्षेत्राच्या सुसुंद बिटातील जनार्दन कोरचे यांच्या शेतात गत चार दिवसांपासून वाघाच्या नर-मादी जोडीने आपला मुक्काम ठोकला आहे.

ठळक मुद्देशेतीची कामे प्रभावित : वनविभाग फोडताहेत केवळ फटाके

आॅनलाईन लोकमतआकोली : खरांगणा वनपरिक्षेत्राच्या सुसुंद बिटातील जनार्दन कोरचे यांच्या शेतात गत चार दिवसांपासून वाघाच्या नर-मादी जोडीने आपला मुक्काम ठोकला आहे. वाघाच्या भीतीने शेतकरी शेतात जात नसल्याने कामे प्रभावित झाली आहेत. वनविभागाच्या कर्मचाºयांनी फटाके फोडले की वाघाची जोडी जंगलात जाते व परत त्याच ठिकाणी येत आहे.प्रारंभी वनविभागाने ही वाघिण बोर व्याघ्र प्रकल्पातील कॅटरिना असल्याचे सांगितले होते; पण आता मात्र ग्रामस्थ व वनविभागाच्या पाहणीत येथे वाघाची जोडी आढळून आली. यामुळे नेमके कोणते वाघ व वाघिण आहे याबाबत संभ्रमावस्था आहे. सदर जंगलात कॅटरिना, बाजीराव, टिंकी, युवराज, कॅटरिनाचे २ वर्षीय तीन बछडे व अन्य वाघाचे वास्तव्य आहे. गत पाच दिवसांपासून सुरेश कोरचे व जनार्दन कोरचे यांच्या शेतात नर-मादिचे वास्तव्य आहे. ग्रामस्थांनी ही बाब वन विभागाला कळविल्यानंतर दररोज वनपथक येवून फटाके फोडतात. त्यामुळे नर-मादीची ही जोडी जंगलात आश्रयाला जातात व फटाक्याचे आवाज बंद झाले की परत शेतात येतात.याबाबत क्षेत्र सहाय्यक दिनकर पाटील म्हणाले की, हा त्यांचा बहुतेक मिलनाचा प्रयत्न असावा, त्यामुळे ते जोडीने थांबले असावे. शिवारातील सुरेश कोरचे, जनार्दन कोरचे, बंडु आडे, तुळसीराम नागोसे, मारोतराव निकोडे, पांडुरंग ठाकरे, निखील काकडे या शेतकºयांनी वाघाच्या दहशतीने शेतात जाणे बंद केले. वेचणीला आलेला कापूस वेचणी करता आला नाही. तुरीचे पीक काढणीला आले आहे. सवंगणी खोळंबली आहे. याशिवाय चना, गहू या रबी पिकांना ओलित करता येत नसल्याने पीक हातचे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कायम संकटाशी झुंज देणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांपुढे नवे संकट घोंगावत आहे. वाघ नर-मादीची जोडी पुन्हा किती दिवस येथे ठिय्या मांडणार याबाबत कुणीही सांगत नसल्याने शेतकरी वर्गात भीती निर्माण झाली आहे. या वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.शेतकऱ्यांवर नवे संकटपेरणीच्या हंगामात नरभक्षी वाघिणीच्या दहशतीच्या सावरात सापडलेले शेतकरी तिच्या दहशतीतून सावरत नाही तो नवे संकट उभे टाकले आहे. वाघांच्या वास्तव्यामुळे शेतीकामाचा विचका झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय या विचाराने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. ही जोडी नेमकी कोणत्या नर-मादीची आहे. याबाबत वनविभागात संभ्रम आहे.