शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जुनोना शिवारात वाघाची दहशत; दोन जनावरांचा पाडला फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 05:00 IST

तालुक्यातील लिंगा मांडवी गावात १९ रोजी पट्टेदार वाघाने थेट गावात प्रवेश करून गोठ्यात बांधून असलेल्या जनावराला जखमी केले. जनावरांचा आवाज आल्याने, पशुपालकाने पाहणी केली असता, पट्टेदार वाघ गोठ्यात ठाण मांडून होता. रात्रभर पहारा दिल्यावर वाघ जंगलात गेला, असा अंदाज ग्रामस्थांनी बांधताच पहाटेच्या सुमारास पुन्हा गावातीलच एका पशुपालकाच्या गोठ्यात दिसून आला. या प्रकारामुळे लिंगा मांडवी गावात वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : तळेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत  जंगला लगत असलेल्या जुनोना शिवारात मागील काही दिवसांपासून पट्टेदार वाघाचा वावर असून त्याने एका आठवड्यात दोन पाळीव जनावरांचा फडशा पाडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.जुनोना शिवार हा जंगल व्याप्त परिसर आहे. वन्यप्राणी शेतात प्रवेश करून उभ्या पिकांची नासाडी करतात. त्यामुळे या शिवारात शेती असलेल्या शेतकऱ्यांना रात्री शेतात जागलीला जावे लागते. अशातच आता पट्टेदार वाघाचा ही या परिसरात वावर असल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये दहशत पसरली आहे. एका आठवड्यात पट्टेदार वाघाने दोन जनावरांना ठार केल्याने तळेगाव येथील शेतकरी राजेंद्र ठाकरे आणि किसन केने यांचे मोठे नुकसान झाले आहे. जुनोना शिवारात शेत जमिनी असलेले शेतकरी अल्पभूधारक असून या भागातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी राजू ठाकरे, किसन केने, किसना कळसकर, सुभाष पाचपोहर, उत्तम भुयार, प्रकाश गाडगे, सुधाकर मांडळे, प्रल्हाद भोजने, मारोत भोजने, नारायण भोजने, अरविंद सायवान, रामराव घोडे, पुंडलिक इरखडे, किसन उईके, अनिल रिठे, अनिल फसाटे, विनोद खवले, राजू बुले, विनोद बोडखे आदींनी केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

वाघाने ठोकला लिंगा मांडवी गावात मुक्काम- कारंजा (घाडगे) : तालुक्यातील लिंगा मांडवी गावात १९ रोजी पट्टेदार वाघाने थेट गावात प्रवेश करून गोठ्यात बांधून असलेल्या जनावराला जखमी केले. जनावरांचा आवाज आल्याने, पशुपालकाने पाहणी केली असता, पट्टेदार वाघ गोठ्यात ठाण मांडून होता. रात्रभर पहारा दिल्यावर वाघ जंगलात गेला, असा अंदाज ग्रामस्थांनी बांधताच पहाटेच्या सुमारास पुन्हा गावातीलच एका पशुपालकाच्या गोठ्यात दिसून आला. या प्रकारामुळे लिंगा मांडवी गावात वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे.- लिंगा हे गाव जंगलव्याप्त परिसरात असून, रात्रीच्या सुमारास गोठ्यातील जनावरे ओरडत असल्याने, शिवाजी डोंगरे यांनी गोठ्यात जाऊन पाहणी केली असता, गोठ्यात वाघ असल्याने त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर, त्यांनी आरडाओरड केली असता वाघाने धूम ठोकली. त्यानंतर, बारकाईने पाहणी केली असता, वाघाने आठपैकी एका जनावराचा कान तोडून त्यास जखमी केल्याचे निदर्शनास आले. रात्रभर वाघाला हाकलून लावण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले. मध्यरात्री उशिरा वाघ जंगलाकडे गेला असावा, असा अंदाज ग्रामस्थांकडून बांधला जात असतानाच, पहाटेच्या सुमारास उमेश गुलाब बिसेने यांच्या गोठ्यात वाघ दिसून आला. एकूणच लिंगा मांडवी गावात रात्रभर वाघाचा मुक्काम राहिल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

 

टॅग्स :Tigerवाघ