सेलू : तालुक्यात वाघांचा संचार आहे़ तीन दिवसांपासून वाघाची दहशत कायम आहे़ मंगळवारी (दि़२०) पहाटे चारमंडळ शिवारात बिबट्याने बोकडाची शिकार केल्याने शेतकऱ्यांत आणखीच भीती निर्माण झाली़ दोन दिवसांपूर्वी वघाळा परिसर वाघांच्या डरकाळ्यांनी हादरला़ यातच चारमंडळ येथील गुलाब महादेव फुटाणे यांच्या घरी गोठ्यात बांधलेला बोकड मंगळवारी पहाटे बिबट्याने ठार केला़
वाघाची दहशत कायम
By admin | Updated: January 20, 2015 22:41 IST