शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वाघाचा हल्ला; वासरु जखमी, शेतकरी बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 22:33 IST

शेतशिवारात जनावरे चारत असताना लपून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक वासरावर हल्ला चढविला. यात वासरु जखमी झाले असून शेतकऱ्यावर चाल करुन जाताच आरडाओड केल्याने वाघाने पळ काढल्यामुळे शेतकरी व इतर जनावरे बचावली.

ठळक मुद्देसालई (पेवठ) शिवारात दोन दिवसांपासून वाघाचा मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्कबोरधरण : शेतशिवारात जनावरे चारत असताना लपून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक वासरावर हल्ला चढविला. यात वासरु जखमी झाले असून शेतकऱ्यावर चाल करुन जाताच आरडाओड केल्याने वाघाने पळ काढल्यामुळे शेतकरी व इतर जनावरे बचावली. ही घटना रविवारी बोर व्याघ्र प्रकल्पालगतच्या सालई (पेवठ) शिवारात घडली असून या शिवारात दोन दिवसापासून वाघ वास्तव्यास असल्याचे सांगितले जात आहे.सालई (पेवठ) येथील शेतकरी पुरुषोत्तम सावरकर हे सकाळी १० वाजता गाय, बैल व वासरु चारायला गेले. जनावरे चरत असताना झुडपात लपून बसलेल्या पट्टेदार वाघाने वासरावर हल्ला चढविल्याने बाकी जनावरे इतरत्र पळाली. ही बाब पुरुषोत्तम सावरकर यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडओरड केली. त्यामुळे वाघ त्यांच्यावरही चाल करुन आला. तेवढ्यात आजुबाजुचे शेतकरीही धावून आल्याने पट्टेदार वाघाने पळ काढला. वाघाच्या हल्ल्या वासरु जखमी झाले. या घटनेची माहिती हिगणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिल्यावर क्षेत्र सहाय्यक व वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाघाच्या दिशेने जात वाघाला हकलून लावले. वाघाच्या या वास्तव्यामुळे शेतात काम कसे करायचे व जनावरांना कसे चारायचे, असा प्रश्न उपस्थित करीत शेतकऱ्यांनी वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. त्यावर वन अधिकाऱ्यांनी जनावरे घरीच बांधून ठेवण्याचा सल्ला दिल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.वनविभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी अडचणीतसालई (पेवठ) या परिसरात या पट्टेदार वाघाचे दोन दिवसांपासून वास्तव्य आहे. याबाबत हिंगणीच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना माहिती दिली. अधिकारी आले आणि पाहून निघून गेले; पण वाघाचा बंदोबस्त केला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या भागात नेहमीच वाघ व बिबट्याचे हल्ले होत असल्याने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Bor Tiger Projectबोर व्याघ्र प्रकल्पTigerवाघ