शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

म्हातारपणात उमटेना अंगठ्याचे ठसे; आधार अपडेट करायचे कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 18:50 IST

वृद्धांकडून व्यक्त होतोय संताप : जन्माचा दाखला आणायचा कुठून?

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी वृद्धांना आधार कार्ड अपडेट करावे लागत आहे. यासाठी जन्माचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र, बहुतांश वृद्धांकडे जन्माचा दाखला नसल्याने आधार अपडेट करणे सध्या तरी त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे.  

जन्माची नोंदच नसल्याने शाळा सोडल्याचा दाखल ग्राह्य धरण्यात यावा, अशी मागणीही केली जात आहे. म्हातारपणात आता जन्माचा दाखल आणायचा कुठून असा प्रश्न वृद्धांकडून विचारला जात आहे. आधार कार्ड हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो. आता विविध शासकीय योजनांसोबत इतरही अनेक ठिकाणी आधार कार्ड गरजेचे मानले जाते. याशिवाय कोणतेही काम होत नाही. विशेष म्हणजे, पूर्वी अनेकांचे आधार कार्ड तयार करताना बऱ्याच त्रुटी आहेत. त्यामुळे कार्डधारकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

आता आधार कार्डमध्ये फेरबदल करताना कार्डधारकांना त्रास होत आहे. अपडेट करताना जन्माचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला देणे आवश्यक आहे. अंगठ्याचे ठसे उमटत नसल्यानेही लाभार्थ्यांची अडचण वाढली आहे.

जुन्या नोंदीच नाहीत• पूर्वी ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे माहिलांची प्रसूती घरीच होत होती. त्यावेळेस जन्माच्या नोंदीला फार महत्त्व दिल्या जात नव्हते.• जन्माच्या नोंदी न केल्यामुळे बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांकडे जन्माचे प्रमाणपत्र नाही. त्यामुळे सध्या लाभार्थीची मोठी अडचण होत आहे.• आधार कार्ड अपडेट करताना ज्येष्ठ नागरिकांकडे वयाचा पुरावा नसतो. त्यामुळे अशा वृद्धांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ग्राह्य धरावे, अशी मागणी केली जात आहे.

शासकीय योजनेपासून वंचित राहण्याची वेळशासकीय कामात मुख्य पुरावा म्हणून आधार कार्ड द्यावे लागते. त्यात शासकीय योजनांचा लाभ घ्यावयाचा असल्यास आधार कार्ड आवश्यकच असते. आधार अपडेट होत नसल्यामुळे अनेक समस्या उभ्या राहत आहेत. त्यात नागरिकांवर शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

अनेकांकडे जन्माची नोंदच नाहीजुन्या काळातील जन्माच्या नोंदी मिळणे कठीण आहे. काही कुटुंब अशिक्षित असल्यामुळे त्यांनी जन्माची नोंदणी केली नाही. अशांनी जन्माचे प्रमाणपत्र कुठून आणावे, असा प्रश्न ज्येष्ठ नागिरकांना पडत आहे. 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डgovernment schemeसरकारी योजनाwardha-acवर्धा