शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाच्या माध्यमातूनच सामाजिक परिवर्तन शक्य

By admin | Updated: June 26, 2014 23:28 IST

शिक्षणामुळेच सामाजिक आणि आर्थिक प्रगती होवून शकते यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून होणारे मानसिक परिवर्तनच सामाजिक परिवर्तन घडवून आणेल. हा छत्रपती शाहू महाराजांचा विश्वास सार्थ ठरवा असे

वर्धा : शिक्षणामुळेच सामाजिक आणि आर्थिक प्रगती होवून शकते यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून होणारे मानसिक परिवर्तनच सामाजिक परिवर्तन घडवून आणेल. हा छत्रपती शाहू महाराजांचा विश्वास सार्थ ठरवा असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक विचारवंत दलित मित्र एम.एन कासारे यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कासारे बोलत होते. समाजकल्याण सभापती नंदकिशोर कंगाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी संजय भागवत, बांधकाम सभापती गोपाल कालोकर, जिल्हा माहिती अधिकारी, अनिल गडेकर, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख, जिल्हा समाजकल्याण अधिकारी जया राऊत उपस्थित होत्या. मानवी जीवनाचा सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून छत्रपती शाहू महराजांनी विविध योजनांची आखणी केल्याचे सांगताना एम.एन.कासारे म्हणाले, समाजातील जातीभेद नष्ट करून प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार दिला. आणि सामाजिक न्याय मिळवून दिला. समाजाचे प्रश्न सोडविताना विकासाची समान संधी दिली. त्यामुळेच सामाजिक व आर्थिक विकास शक्य झाला असल्याचे त्यांनी सांगितले. समाजकल्याण सभापती नंदकिशोर कंगाले यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना वंचितापर्यंत पोहचवून त्यांना त्यांचा लाभ मिळावा यासाठी समाजानेही पुढाकार घ्यावा. अपंग अथवा महिलांना समान संधी मिळावी त्यांना त्याचे हक्क मिळावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. गोपाल कालेकर यांनीही सामाजिक न्याय हा सर्वांना समान असावा आणि समाजातील वंचितांचे प्रश्न सुटावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी सामाजिक न्याय दिनाचे दीप प्रज्वलीत करून उद्घाटन केले. तसेच छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले.यावेळी शालांत परीक्षेत प्रावीण्य मिळविल्याबद्दल गर्ल्स हायस्कूल आंजी येथील प्रगती विजय झपाटे, समीक्षा दीपक भगत, अमर दिनकर कोयरे, शिवानी सुधाकर गायकवाड, तसेच बारावी परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी मोनिका घडे, गजानन नेहरे, प्रणाली कांबळे, सोनाली ककुर्ले, प्राची पाटील यांचा अतिथींच्या हस्ते रोख व स्मृतिचिन्ह देवूून गौरव करण्यात आला.(प्रतिनिधी)