शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
3
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
4
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
5
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
6
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
7
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
8
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
9
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
10
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
11
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
12
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
13
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
14
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
15
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
16
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
17
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
18
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
19
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
20
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट

कंपनी प्रशासनाविरोधात तीन कामगारांचे बेमुदत उपोषण

By admin | Updated: April 11, 2016 02:16 IST

येथील सुगुणा फूड्स कंपनीतील कामगारांवर व्यवस्थापनाकडून सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप करीत ....

हिंगणघाट येथील कंपनी : भेदभावपूर्ण व्यवहाराचा आरोपहिंगणघाट : येथील सुगुणा फूड्स कंपनीतील कामगारांवर व्यवस्थापनाकडून सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप करीत तीन कामगारांनी शनिवारी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. यात नंदकिशोर काळे, दामोधर वंजारी आणि चेतन पिसे या कामगारांचा समावेश आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवय आहे.कामगारांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकानुसार, सुगुणा कंपनीचे व्यवस्थापन आणि कंत्राटदार यांच्यातील हितसंबंधामुळे कामगारांशी भेदभावपूर्ण व्यवहार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापनास विचारल्यास संबंधित कामगारांवर कारवाईची बडगा उगारण्यात येत होता. या प्रकाराला कंटाळून कामगारांनी संघटना बनविण्याचे ठरविले. याबाबत व्यवस्थापनाला माहिती मिळताच त्यांनी संघटना संपविण्याच्या दृष्टीने कारवाई सुरू केली. व्यवस्थापनाने संघटनेचे पदाधिकारी आणि काही सदस्यांना राजीनामा देण्यास सांगितले. कामगारांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने त्यांना दुसऱ्या राज्यात बदली करण्याची धमकी देण्यात आली, असे कामगारांचे म्हणणे आहे. ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. त्यांची बदली करून संघटना संपविण्याचा बेकायदेशीर डाव रचण्यात आल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकाराची लेखी व तोंडी तक्रार कामगारांनी मागील तीन महिन्यांपासून अप्पर कामगार आयुक्त, सहायक कामगार आयुक्त यांच्यासह शासनाच्या सर्वच संबंधित यंत्रणेकडे केली; परंतु अधिकाऱ्यांनी कामगारांच्या तक्रारीची साधी दखलही घेतली नाही. या सर्व प्रकाराने त्रस्त झालेल्या कामगारांनी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला. न्याय मिळेपर्यंत कायदेशीर मार्गाने लढा कायम ठेवण्याचा निर्धार कामगारांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून व्यक्त केला आहे. कामगारांच्या या उपोषण मंडपाला किसान अधिकार अभियानाचे तालुका अध्यक्ष प्रवीण उपासे, धनंजय बकाणे, आम आदमी पक्षाचे मनोज रूपारेल, जगदीश शुक्ला, प्रहारचे गजू कुबडे यांनी भेट दिली.(तालुका प्रतिनिधी)