शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार वीज ग्राहकांनी गो ग्रीन योजनेतून वीज बिलात वाचवले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 18:59 IST

Wardha : एसएमएसचा निवडला अनेकांनी पर्याय

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : महावितरणच्या ग्राहकांनी वीज बिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून केवळ 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडून महावितरणच्या पर्यावरणपूरक 'गो- ग्रीन' योजनेला प्रतिसाद दिलेला आहे. या योजनेनुसार छापील वीज बिलाच्या कागदाऐवजी फक्त 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडल्यास वीज ग्राहकांना प्रतिबिलात दहा रुपयांची सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीज बिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत आहे.

महावितरणच्या संगणकीय प्रणालीद्वारे वीज बिल तयार झाल्यानंतर लगेचच ते 'गो-ग्रीन' योजनेतील ग्राहकांना 'ई-मेल'द्वारे पाठविण्यात येत आहे. 'एसएमएस'द्वारे वीज बिलाची माहिती देण्यात येत आहे. यासोबतच ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा लाभ घेऊन हे वीज बिल ऑनलाइनद्वारे भरण्याची सोयदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गो ग्रीन योजनेत ग्राहकांनी आपला सहभाग नोंदविला असून, यात वर्धा मंडळामध्ये ३ हजार ३६ ग्राहकांनी वीज बिलासाठी छापील कागदाऐवजी 'ई- मेल' व 'एसएमएस'ला पसंती देत पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारला आहे.

योजनेत सहभागी होण्याचे आवाहन• 'गो-ग्रीन' योजनेत सहभागी झालेल्या वीज ग्राहकांना छापील वीज बिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीज बिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर चालू वीज बिलासह मागील ११ महिन्यांचे असे एकूण १२ महिन्यांचे वीज बिल मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत.• ई ऑफीस प्रणालीमध्ये प्रत्यक्ष कागदाचा वापर न करता माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पेपरलेस कामावर भर आहे. वीज ग्राहकांनी गो ग्रीनच्या सवलतीचा लाभ घेतला, तर छापील बिले कमी होऊन कागदाचा वापर कमी होईल व पेपरलेस कामाला चालना मिळेल, तसेच पर्यावरणाचे रक्षण होईल.

असे होता येईल योजनेत सहभागीमहावितरणच्या गो-ग्रीन' योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलावर छापलेल्या जीजीएन या १५ अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाइल अॅपद्वारे किंवा महावितरणच्या करावी. याबाबतची अधिक माहिती mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलीअसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

बिलाच्या रंगीत प्रिंटचीही सोयवीज ग्राहकांना छापील वीज बिलांची गरज भासल्यास त्यांना ई- मेलद्वारे प्राप्त झाले दर महिन्याचे वीज बिल जतन करून ठेवतात.'गो-ग्रीन' योजना ही काळाची गरज असून, जास्तीत जास्त वीज

ग्राहकांनी कागद विरहित वीज बिलांसाठी या योजनेत सहभागी व्हावे. जिल्हाभरातील सुमारे तीन हजार ३६ ग्राहकांनी वीज बिलासाठी छापील कागदाऐवजी 'ई-मेल' व 'एसएमएस'ला पसंती देत पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारला आहे.- प्रदीप घुरुडे, प्रभारी अधीक्षक अभियंता महावितरण, वर्धा.

 

टॅग्स :electricityवीजMIDCएमआयडीसीwardha-acवर्धा