शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आष्टीत तीन उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 23:40 IST

येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने नवीन नगराध्यक्ष कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान आमदार अमर काळे यांनी अनिता भातकुलकर यांच्या नावाची घोषणा केल्याने त्यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या अनिता भातकुलकर होणार नगराध्यक्षपदी विराजमान ?

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने नवीन नगराध्यक्ष कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान आमदार अमर काळे यांनी अनिता भातकुलकर यांच्या नावाची घोषणा केल्याने त्यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे आष्टीच्या नव्या नगराध्यक्ष काँग्रेसच्या अनिता भातकुलकर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्यावतीने दोन नगरसेवकांनी अर्ज दाखल केले आहे.मुख्याधिकारी पंकज गोसावी यांच्याकडे काँग्रेसच्या अनिता भातकुलकर तर भाजपचे अ‍ॅड. मनीष ठोंबरे, अजय लेकुरवाळे यांनी अर्ज दाखल केले आहे. काँग्रेसकडे एकूण १० नगरसेवक आहे. भाजपकडे सहा तर एक अपक्ष नगरसेवक आहे. गत निवडणुकीच्या वेळी अपक्ष नगरसेवकाने काँग्रेसला समर्थन दिल्याने त्याला बांधकाम सभापती मिळाले होेते. यावेळी सुद्धा ते काँग्रेस सोबत राहणार आहेत.नगराध्यक्ष कोण होणार याची गत महिनाभरापासून चर्चा सुरू होती. नगरसेविका जयश्री मोकद्दम यांची फिल्डींग जोरदार लागली होती. मात्र गुरुवारी आष्टीत आ. अमर काळे येताच अर्ध्याअधिक नगरसेवकांनी नगरसेविका अनिता भातकुलकर यांचे नाव सुचविले. भातकुलकर यांचा परिवार २५ वर्षांपासून काँग्रेससोबत एकनिष्ठ आहे. शिवाय त्या उच्च शिक्षित असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.शुक्रवारी काँग्रेस पक्षाचे पंकज वाघमारे आर्वी येथून अधिकृत उमेदवारी अर्ज घेवून आले. माजी सभापती अरुण बाजारे, युवक काँगे्रस अध्यक्ष युवराज राऊत यांच्या उपस्थितीत भातकुलकर यांनी अर्ज दाखल केला आहे. २३ मे रोजी अधिकृतरित्या नावाची निवडणुकीची औपचारिकता पूर्ण होईल. यानंतर उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे.समुद्रपुरात नगराध्यक्षाकरिता दोन नामांकनसमुद्रपूर- येथील नगर पंचायत अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नामांकन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी भाजपाच्यावतीने गजानन राऊत यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हर्षा प्रदीप डगवार यांनी नामांकन दाखल केले. दोन्ही अर्ज नगर पंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. माळगावे यांच्याकडे सादर केले. त्यांनी दोन्ही अर्ज दाखल करुन घेतले. २२ मे नामांकनपत्र मागे घेण्याची तारीख असून त्याच दिवशी अर्जांची तपासणी करण्यात येणार आहे. २३ मे रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्ष