शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रभारीं’च्या खांद्यावरून शहरातील तीन महत्त्वाच्या कार्यालयांचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2022 05:00 IST

कारंजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांची  बदली झाल्यापासून  ते पद रिक्त आहे. याचा पदभार नायब तहसीलदार किशोर साळवे यांच्याकडे देण्यात आला आहे. सध्या ते प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कामकाज सांभाळत आहेत. मात्र, अनेक महत्त्वाच्या समस्यांबाबत ठोस निर्णय घेऊ शकत नाही. ग्रामीण रुग्णालयाचा कारभार मागील १५ वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकाविना सुरू आहे.

अरूण फाळकेलोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : ग्रामीण भागासह शहराचा कारभार सुरळीत चालण्यासाठी महत्त्वाच्या कार्यालयांत नियमित कार्यालयप्रमुख अधिकारी असणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण व शहरी व्यवस्थापन आणि कार्यालयाचा कारभार सुरळीत आणि गतिशीलपणे चालू शकतो. मात्र, कारंजा शहरातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय आणि नगरपंचायतीच्या कार्यालयाला अनेक वर्षांपासून नियमित कार्यालयप्रमुख नसल्याने या तिन्ही कार्यालयाचा कारभार प्रभारींच्या खांद्यावरून हाकणे सुरू आहे. यामुळे कामकाजावर विपरित परिणाम होत असल्याचे चित्र आहे. नियमित कार्यालयप्रमुख नसल्याने अनेकदा महत्त्वाचे निर्णय घेणे, कर्मचाऱ्यांकडून शासकीय योजना राबवून घेणे, कामात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करणे आदी प्रभारी अधिकाऱ्यांना कठीण जाते. संबंधित कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांकडून प्रमुख अधिकारीच नसल्याने कर्तव्य बजावताना दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम कामकाजावर होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कारंजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांची  बदली झाल्यापासून  ते पद रिक्त आहे. याचा पदभार नायब तहसीलदार किशोर साळवे यांच्याकडे देण्यात आला आहे. सध्या ते प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कामकाज सांभाळत आहेत. मात्र, अनेक महत्त्वाच्या समस्यांबाबत ठोस निर्णय घेऊ शकत नाही. ग्रामीण रुग्णालयाचा कारभार मागील १५ वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकाविना सुरू आहे. सध्या या रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. प्रभाकर वंजारी हे कामकाज सांभाळत आहे, तर ग्रामीण भागाच्या विकासाची नाळ ज्या कार्यालयाशी जुळली असते, असे महत्त्वाचे समजले जाणाऱ्या पंचायत समितीचा कारभारदेखील प्रभारी म्हणून कृषी अधिकारी पंधरे सांभाळत  आहेत. नगर पंचायतीला नियमित मुख्याधिकारी नसल्याने शहराचा कारभार ढेपाळला आहे. पाण्याची समस्या भीषण आहे. अग्निशमन दलाबाबत ते निर्णय घेऊ शकले नाही. क्रीडा संकुल, अतिक्रमण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेतील प्रसाधनगृह व स्वच्छतागृह बांधकाम आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची  व्यवस्था  ते करू शकले नाही, हे विशेष. याकडे प्रशासनाने लक्ष देत तत्काळ कायमस्वरुपी अधिकारी देण्याची गरज आहे.

मुख्यालयी राहण्यास अडचणी-    ग्रामीण रुग्णालयातील प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांना वर्धा आणि नागपूर येथे अनेकदा मीटिंगला जावे लागत असल्याने ते आपल्या मूळ पदाला न्याय देऊ शकत नाहीत. सतत मुख्यालयी राहू शकत नसल्याने ग्रामीण रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण जात आहे. 

लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज-    तिन्ही प्रमुख कार्यालयातील कारभार प्रभारींच्या खांद्यावरून हाकणे सुरू असल्याने नागरिकांच्या समस्यांचे निवारण होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून आपला राजकीय प्रभाव वापरून तिन्ही प्रमुख कार्यालयातील रिक्त पदावर नियमित  अधिकाऱ्याची वर्णी लावावी, अशी मागणी गावातील नागरिकांकडून केली जात असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

तालुक्यातील सर्वच विभागात बदलीचे ‘वारे’-    सध्या सर्वच विभागात बदलीचे वारे वाहू लागल्यामुळे या तिन्ही प्रमुख कार्यालयातील रिक्त पदांवर नियमित अधिकाऱ्यांची वर्णी लागेल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, अद्याप कुणाचाही आदेश निघाला नसल्याने सध्या तरी हा कारभार प्रभारींच्या खांद्यावरून रामभरोसे सुरू राहणार असल्याचे चिन्हे दिसत आहे. 

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल