शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजार वृक्षांना आगीची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:56 IST

शहरातील आयटीआय टेकडीवरील जल शुद्धीकरण केंद्रा लगत निसर्ग सेवा प्रकल्पाचे आॅक्सिजन पार्क असून या पार्कमध्ये बुधवारी दुपारी अडीच ते तीन वाजतादरम्यान अचानक आग लागली. वाळलेले गवत असल्याने ही आग अल्पावधीतच पसरली. यात जवळपास साडेतीन हजार वृक्षांना आस लागली असून काही वृक्ष जळाले.

ठळक मुद्देनिसर्ग सेवा प्रकल्पात आग : काही वृक्ष होरपळले, टवाळखोरांचा बंदोबस्त करा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील आयटीआय टेकडीवरील जल शुद्धीकरण केंद्रा लगत निसर्ग सेवा प्रकल्पाचे आॅक्सिजन पार्क असून या पार्कमध्ये बुधवारी दुपारी अडीच ते तीन वाजतादरम्यान अचानक आग लागली. वाळलेले गवत असल्याने ही आग अल्पावधीतच पसरली. यात जवळपास साडेतीन हजार वृक्षांना आस लागली असून काही वृक्ष जळाले. नगर पालिकेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविली. येथे नेहमीच टवाळखोराचा डेरा राहत असून त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.आयटीआय कॉलेजच्या बाजुला असलेल्या टेकडीवर निसर्ग सेवा समितीने २००० पासून वृक्षांची लागवड व संगोपण केले. सध्या या परिसरात ११ हजार वृक्षांची लागवड केली असून परिसर हिरवागार झाला आहे. निसर्ग सेवा समितीसह काही निसर्गप्रेमी आपल्या श्रमदानातून वृक्षांचे संगोपण करीत आहे; पण काही समाजकंटकांना ही हिरवळ पाहावली जात नाही की काय? असाच प्रश्न वारंवार लागणाऱ्या आगीमुळे निर्माण होत आहे. यापूर्वीही याच परिसरात आग लागल्याने वृक्षांचे नुकसान झाले. चार ते पाच दिवसापूर्वी हनुमान टेकडीवरील वैद्यकीय जनजागृती मंचाने तयार केलेल्या आॅक्सिजन पार्कमध्येही आग लागल्याने अनेक वृक्षांना झळ पोहोचली होती. आज पुन्हा बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास म्हाडा कॉलनीलगतच्या भागातील टेकडीवर आग लागल्याचे नागरिकांना दिसले. त्यामुळे काहींनी आगीच्या दिशेने धाव घेत नगरसेवक निलेश किटे यांना माहिती दिली. किटे यांनी लागलीच न.प.चा अग्निशामन बंब पाठविला. त्यांनी टेकडीच्या खालच्या बाजुने पाण्याचा मारा करीत आग विझविली. त्यानंतर जलशुद्धी केंद्रालगतच्या वरील बाजुने जात आगीवर नियंत्रण मिळविले. पण, या आगीत जवळपास साडेतीन हजार वृक्षांना झळ पोहोचल्याचे निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी सांगितले. आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही.पण, वारंवार होणाऱ्या घटनेमुळे यावर आळा घालण्याची गरज व्यक्त होत आहे.जलशुद्धी केंद्र परिसरात शुकशुकाटआयटीआय टेकडीवरील जलशुद्धीकेंद्रालगतच्या परिसरात आग लागल्यानंतर अनेकांनी त्या दिशेने धाव घेतली. परंतु जलशुद्धीकेंद्र परिसरात शुकशुकाट होता. ही आग वरच्या दिशेने जात असल्याचे लक्षात येताच अग्निशमन दल तेथे पोहोचल्यानंतर सारेच धाऊन आले.निसर्ग सेवा प्रकल्पाच्या दर्शनी भागाला असलेल्या गेटमधून अग्निशमन बंब आत नेण्याकरिता गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

टॅग्स :fireआग