शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तेरा गावांत आता दोन दिवसाआड नळाला पाणी; ग्रामस्थांना करावा लागेल पाण्याचा काटकसरीने वापर

By महेश सायखेडे | Updated: April 21, 2023 18:37 IST

शहरालगतच्या पिपरी (मेघे)सह तेरा गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासन पाणीपुरवठा करते.

वर्धा : शहरालगतच्या पिपरी (मेघे)सह तेरा गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासन पाणीपुरवठा करते. पण सध्या पाण्याची मागणी वाढल्याने आणि योग्य दाबाने नागरिकांना पाणीपुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आल्याने या तेरा गावांना आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे या गावांमधील नागरिकांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा लागणार आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येळाकेळी येथील धाम नदीच्या पात्रातून पाण्याची उचल करून पिपरी (मेघे), सिंदी (मेघे), उमरी (मेघे), सावंगी (मेघे), बोरगाव (मेघे), भुगाव, वायगाव (नि.), कारला, आलोडी, साटोडा, नालवाडी, दत्तपूर, म्हसाळा, वरूड या गावांमधील नागरिकांची तृष्णातृप्ती करते. संबंधित तेरा गावांतील सुमारे २१ हजार कुटुंबांना मजिप्रा नळाद्वारे एक दिवसाआड पाणीपुरवठा करत असले तरी सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची मागणी बऱ्यापैकी वाढली आहे. नागरिकांची वाढती पाण्याची मागणी आणि पाणीपुरवठा योग्य दाबाने होत नसल्याचे निदर्शनास आल्यावर उन्हाळ्याच्या दिवसांतही नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे मजिप्राच्या वतीने निश्चित करण्यात आले आहे. आजपासून होणार अंमलबजावणीपाण्याची वाढती मागणी तसेच पाणी पुरवठा योग्य दाबाने होत नसल्याचे निदर्शनास आल्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने वर्धा शहरालगतच्या तेरा गावांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निश्चित केले आहे. याची अंमलबजावणी २२ एप्रिलपासून होणार आहे. २१ जलकुंभात पाणी स्टोअर करत होतो पाणीपुरवठामहाराष्ट्र जीवन प्राधिकरण येळाकेळी येथील धाम नदीच्या पात्रातून दररोज २२ दशलक्ष लिटर पाण्याची उचल करून पाण्यावर प्रक्रिया करते. पिण्यायोग्य पाणी तब्बल २१ जलकुंभात साठविल्या जाते. याच पाण्याचा पुरवठा पिपरी (मेघे)सह तेरा गावांमधील नागरिकांना केला जातो. पाण्याची वाढती मागणी आणि योग्य दाबाने पिपरी (मेघे)सह तेरा गावांना पाणीपुरवठा होत नसल्याचे लक्षात आले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांतही नागरिकांना मुबलक पाणी मिळावे या हेतूने संबंधित तेरा गावांत आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. - पी. वाय. मदनकर, उपअभियंता, मजिप्रा, वर्धा.

टॅग्स :wardha-acवर्धा