शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

राज्य शिक्षणात तिसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 22:21 IST

कोणतंही मूल नापास होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखायला आपण कमी पडतो आणि म्हणून आपल्या सोईसाठी त्याच्या कपाळावर अनुत्तीर्णचा शिक्का लागतो. विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षित करणे म्हणजे शिक्षण, असे मानून राज्य शासन शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवित आहे.

ठळक मुद्देविनोद तावडे : ‘शिक्षणाची वारी’चे उद्घाटन, १०० आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोणतंही मूल नापास होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखायला आपण कमी पडतो आणि म्हणून आपल्या सोईसाठी त्याच्या कपाळावर अनुत्तीर्णचा शिक्का लागतो. विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षित करणे म्हणजे शिक्षण, असे मानून राज्य शासन शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवित आहे. त्याचा परिणाम म्हणजे ४ वर्षांत राज्य शिक्षणाच्या बाबतीत देशात १६ व्या क्रमांकावरून ३ क्रमांकावर आले आहे आणि यावर्षी ते प्रथम क्रमांकावर राहील. विद्यार्थी घडविणे हा मूळ उद्देश असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले.वर्धा येथील चरखाघर येथे आयोजित शिक्षणाची वारी&या उपक्रमाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, विभागीय आयुक्त संजीव कुमार , शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, नगराध्यक्ष अतुल तराळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, सभापती सोनाली कलोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, पंचायत समिती सभापती महानंदा ताकसांडे, शिक्षण विभागाचे संचालक सुनील मगर, माजी खासदार सुरेश वाघमारे, जि.प. सदस्य नूतन राऊत, प्राचार्य डॉ. किरण धांडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिवलिंंग पटवे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सिद्धार्थ मेश्राम आदी उपस्थित होते. राज्यात शिक्षण क्षेत्रात विविध गुणात्मक बदल झाल्यामुळे अनेक शिक्षकांनी त्याचे स्वागत करून ते राबविल्यामुळे आज शिक्षणात गुणात्मक बदल दिसतोय. वर्धेत १ हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून जिल्हा परिषद शाळेत आणण्याचे काम जिल्हा परिषद शिक्षकांनी केले आहे. हा त्या जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढली आहे याचा परिणाम असून याचे श्रेय शिक्षकांना जातेय, असे तावडे म्हणाले. इंग्रजीतून शिक्षणाला विरोध नाही, हे स्पष्ट करताना ते म्हणाले, मराठी भाषा ही डोळे असून, इंग्रजी भाषा ही चष्मा आहे. त्यामुळे दृष्टी असल्याशिवाय दूरदृष्टी येणार नाही. म्हणून मातृभाषेतून शिक्षणाला नेहमीच पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना शाबासकी देण्यासाठी आणि त्यांचे प्रयोग राज्यभर पोहोचून इतर शाळांनी तसेच उपक्रम राबवून राज्याला शैक्षणिकदृष्ट्या प्रगत करावे, यासाठी शिक्षणाची वारी हा उपक्रम सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यात ६४ हजार शाळा शिक्षक आणि लोकप्रतिनिधींच्या लोकवर्गणीतून डिजिटल झाल्या आहेत. आता केंद्र शासन देशातील १५ लाख शाळांमध्ये डिजिटल बोर्ड हा उपक्रम सुरू करणार आहे. राज्य शासन नापास विद्यार्थ्यांसाठी वन टू वन करिअर समुपदेशन करून त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देत आहे. घोकंपट्टी परीक्षा पद्धतीमुळे महाराष्ट्र संशोधक तयार करण्यात कमी पडला आहे. त्यामुळे मागील ४ वर्षांपासून इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम बदलला आहे. तसेच यापुढे विद्यार्थीसंख्येच्या प्रमाणात शिक्षकाची उपलब्धता होणार असल्यामुळे शिक्षकांना विविध उपक्रम राबविण्यासाठी वेळ मिळेल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी विनोंद तावडे यांनी शिक्षक, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या शिक्षणविषयक प्रश्नांना उत्तरे दिलीत.यावेळी श्री विद्यामंदिर कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी काव्या शशिकांत इरूटकर हिने दफ्तराच्या ओझ्याबाबत प्रश्न उपस्थित केला, तेव्हा तावडे यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना यावर नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगितले. मुलाच्या वजनाच्या १० टक्केच बॅगचे वजन असले पाहिजे, असे शासन निर्देश आहे, असे सांगितले. १० जिल्हे या वारीला जोडले असून ६ जानेवारी पर्यंत चालणा?्या वारीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक सुनील मगर यांनी प्रस्ताविकातून केले. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी केले तर आभार शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांनी मानले.बालरक्षक चळवळराज्यात बालरक्षक चळवळीच्या माध्यमातून कोणतेही मूल शाळाबाह्य राहू नये यासाठी काम करीत आहे. या माध्यमातून गोंदिया जिल्हा हा शाळाबाह्य विद्यार्थीमुक्त जिल्हा झाला आहे, असे विनोद तावडे यांनी सांगितले. यावेळी आमदार पंकज भोयर आणि आमदार समीर कुणावर यांनीही शिक्षणाच्या वारीला शुभेच्छा दिल्यात. यावेळी अनटोल्ड स्टोरी या दिव्यांगानी त्यांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी केलेल्या यशोगाथेच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. दीप्ती बेले या कान्हापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीचा दीपकाव्य कवितासंग्रह, शुभांगी वासनिक यांच्या रत्नाची खाण आणि सार्थक जीवनासाठी संस्कार पर्व या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. शिक्षणाची वारीमध्ये विविध शाळांच्या वतीने 55 दालने लावण्यात आली आहेत .ओपन बोर्डची स्थापना करणारकाहीं विद्यार्थी संगीत, अभिनय, गायन ,खेळ यामध्ये रस असतो. पण, शाळेमुळे त्यांना त्यांच्या या सुप्त गुणांवर लक्ष देता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांचे त्या-त्या क्षेत्रात उत्तम करिअर घडावे यासाठी आणि शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी असे ओपन बोर्ड यापुढे त्याला मदत करेल.शास्त्रज्ञांनी तयार केला अभ्यासक्रमच्महाराष्ट्र आंतराष्ट्रीय शैक्षणिक बोर्डाची स्थापना करून राज्य शासनाने यावर्षी १३ शाळा सुरू केल्यात. पुढील वर्षात १०० शाळा सुरू करणार असल्याचे शिक्षण मंती विनोद तावडे यांनी सांगितले. याचा अभ्यासक्रम डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. काकोडकर, विजय भटकर, सोनम वांगचोक यांच्यासारख्या शास्त्रज्ञांनी तयार केला आहे, असेही त्यानी यावेळी सांगितले.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेEducationशिक्षण