शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावणेदोन लाखांच्या संत्र्यावर चोरट्याने केला हात साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 05:00 IST

खरसखांडा  येथील माजी सरपंच विकास नासरे यांनी त्यांच्या शेतातील संत्रा पिकाची तोडणी करून शेतातच संत्र्याचा ढीग करून ठेवला. मध्यरात्रीच्या सुमारास पाच अज्ञात व्यक्तींनी नासरे यांच्या शेतात येत संत्र्याच्या ढिगाशेजारी झोपून असलेल्या मजुरांना धमकाविले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांपैकी एकाने मालवाहू वाहनाला पाचारण केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : तालुक्यातील अनेक शेतकरी संत्रा पिकाचे उत्पादन घेतात. अशाच एका संत्रा उत्पादकाचा तोडणी केलेला पावणेदोन लाखांचा संत्रा चोरट्याने काळोखाचा फायदा घेत मालवाहूच्या साहाय्याने चोरून नेला. ही घटना मध्यरात्री तालुक्यातील खरसखांडा शिवारात घडली असून रविवारी सकाळी उघडकीस आली.खरसखांडा  येथील माजी सरपंच विकास नासरे यांनी त्यांच्या शेतातील संत्रा पिकाची तोडणी करून शेतातच संत्र्याचा ढीग करून ठेवला. मध्यरात्रीच्या सुमारास पाच अज्ञात व्यक्तींनी नासरे यांच्या शेतात येत संत्र्याच्या ढिगाशेजारी झोपून असलेल्या मजुरांना धमकाविले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांपैकी एकाने मालवाहू वाहनाला पाचारण केले.हिंदी आणि मराठी भाषेचा वापर करून संवाद साधणाऱ्या चोरट्यांनी ढीग करून असलेल्या सुमारे पाच टन संत्र्यापैकी तीन टन संत्रा मालवाहूत लादून चोरून नेला. चोरट्यांनी घटनास्थळावरून यशस्वी पळ काढल्यावर घाबरलेल्या मजुरांनी स्वत:ला सावरत नासरे यांचे घर गाठून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर नासरे यांनी संत्राचोरीची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी तक्रारीवरून कारंजा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली असून पुढील तपास कारंजाचे ठाणेदार दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात प्रफुल्ल माहूर करीत आहेत.

परिसरात चोरट्यांची दहशत-   खरसखांडा येथे चक्क माजी सरपंचाच्या शेतातून संत्रा पळविण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील चोरट्यांचा कारंजा पोलीस शोध घेत असले तरी या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये चोरट्यांबाबत कमालीची दहशत पसरली आहे.

 

टॅग्स :Thiefचोरagricultureशेती