शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कुरियर कंपनीचा नोकरच निघाला चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:54 IST

कुरीयर कंपनीच्या कार्यायाची डुप्लीकेट चाबी बनवून दुकानातून साहित्य लंपास करणाºया नोकरासह त्याच्या सहकाºयाना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांकडून चोरीतील ९३ हजार ७३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्देदोघांना अटक : ९३,७३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ऑनलाईन लोकमतवर्धा : कुरीयर कंपनीच्या कार्यायाची डुप्लीकेट चाबी बनवून दुकानातून साहित्य लंपास करणाºया नोकरासह त्याच्या सहकाºयाना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांकडून चोरीतील ९३ हजार ७३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.भावेश कोरडे (१९) रा. मुर्तिजापूर (तरोडा) ता. तिवसा, जि. अमरावती शुभम सुधीर बोके (२३) रा. आर्वी असे अटकेत असलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलीस सुत्रानुसार, ११ फेब्रुवारी रोजी आर्वी येथील साईनगर परिसरातील ई-कॉम एक्सप्रेस प्रायव्हेट लिमीटेड या कुरीयर कंपनीत चोरी झाल्याची तक्रार सागर सूर्यकांत मोरे यांनी पोलिसात दिली. चोरट्याने पाच मोबाईल हॅन्डसेट व रोख १ लाख ७ हजार २९१ रुपये व इतर साहित्य चोरल्याचे तक्रारीत नमूद केले होते. तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या ४५७, ३८० कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला असता मुर्तिजापूर (तरोडा) येथील भावेश कोरडे याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने या कामात त्याला शुभम सुधीर बोके (२३) रा. आर्वी याची मदत मिळाल्याचे सांगितले. शुभम हा याच कुरीयर कंपनीत नोकर आहे. त्याने बनावट चाबी बनवून एक महिन्यापूर्वी ही चोरी केल्याचे सांगितले. यश चोरट्यांकडू पोलिसांनी एकूण ९३ हजार ७३७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात उदयसिंग बारवाल, परवेज खान, दिवाकर परिमल, अमर लाखे, आनंद भस्मे, दिनेश बोथकर, निलेश कट्टोजवार, कुलदीप टांकसाळे, आत्माराम भोयर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या चमुने केली.सुपरवायझर म्हणून बढती नाकारल्याने चोरीशुभम बोके हा या कुरीयर कंपनीत डिलव्हरी बॉय म्हणून एक वर्षापासून कार्यरत होता. कामादरम्यान त्याने बढती करण्याची मागणी मालकाला केली. यावेळी मालकाने त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत त्याला कामावरून कमी केले. हा राग मनात धरून त्याने कंपनीच्या कार्यालयाची डुप्लीकेट चावी अमरावती येथे बनवून ही चोरी केल्याची कबुली दिली.

टॅग्स :theftचोरी