लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आरोग्य सेविका वंदना उईके (सयाम) यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. सदर निलंबन मागे घेईपर्यंत कामबंद आंदोलन पुकारून ते सुरूच ठेवण्यात येईल, शिवाय सोमवारी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना घेराव करण्याचा निर्णय रविवारी स्थानिक झाशीराणी चौक भागातील जिल्हा प्रशिक्षण पथक कार्यालयासमोर पार पडलेल्या आयटक संलग्न आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जिल्हास्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे.राष्ट्रपती पुरस्कार आरोग्य सेविका वंदना उईके (सयाम) यांच्यावर केलेल्या निलंबनाच्या कारवाईच्या निषेधार्थ रविवारी जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाºयांची विशेष बैठक जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ तेलतुंबडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी हिवताप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विनोद भालतडक, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य सरचिटणीस गजानन थुल, आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, विभागीय सचिव नलिनी उबदेकर, उपाध्यक्ष विजय जांगडे, सुजाता कांबळे, संजय डफरे, दीपक कांबळे, गजानन पिसे, प्रभाकर सुरतकर, रतन बेंडे, अनुराधा परळीकर, संजय तायडे,अरविंद बोटफुले, राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी संघटनेच्या अश्विनी मेंढे, तारा भोंगाडे, गीता बकाने, विजय वांदिले, तुळशीराम राठोड, किरण पांडे, वंदना पेंदाम, ललीता अडसर, वंदना कोकड, शशीकांत अडसर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले.बैठकीदरम्यान आरोग्य कर्मचाºयांच्या समस्यांसह विविध विषयांवर चर्चा करून सदर निर्णय घेण्यात आला. उपस्थितांचे आभार दीपक कांबळे यांनी मानले. बैठकीला जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
‘ते’ निलंबन मागे घेईपर्यंत कामबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:05 IST
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आरोग्य सेविका वंदना उईके (सयाम) यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. सदर निलंबन मागे घेईपर्यंत कामबंद आंदोलन पुकारून ते सुरूच ठेवण्यात येईल, .....
‘ते’ निलंबन मागे घेईपर्यंत कामबंद
ठळक मुद्देआरोग्य सेवकांची भूमिका : जिल्हास्तरीय बैठकीत निर्णय